Home /News /national /

Air Crash: जीव धोक्यात घालून वाचवले प्रवाशांचे प्राण, आता ते 600 जण झाले क्वारंटाइन

Air Crash: जीव धोक्यात घालून वाचवले प्रवाशांचे प्राण, आता ते 600 जण झाले क्वारंटाइन

बचाव कार्यात सहभागी झालेल्या त्या 600 जणांनी आपला जीव धोक्यात घालून त्या 150 प्रवाशांचे प्राण वाचविले होते.

    नवी दिल्ली 10 ऑगस्ट: कोझिकोड इथं झालेल्या भीषण विमान अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर 150 जणांचे प्राण वाचले होते. विमानतळावरचं बचाव दलाचं पथक आणि प्रशासनाच्या मदतीने अपघात झाला त्या रात्री बचाव कार्य राबविण्यात आलं होतं. त्यात 600 जणांनी सहभाग घेतला होता. खबरदारीचा उपाय म्हणून आता त्या सर्वांना क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आलं आहे. 8 ऑगस्टला रात्री कोझिकोड विमानतळावर हा भीषण अपघात झाला होता. दूबईहून आलेलं विमान धावपट्टीवर न थांबता पुढे गेलं आणि दलदलीत फसलं होतं. त्याचे दोन तुकडेही झाले होते. त्यानंतर काही तास मोठं बचाव कार्य सुरु होतं. त्यात मल्लापूरमचे जिल्हाधिकारी के. गोपालकृष्णन यांचाही समावेश होता. आता जिल्हाधिकाऱ्यांसह सगळ्यांनाच क्वारंटाइन राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. स्थानिक आरोग्य अधिकारी हे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार आहेत. कोरोनाची साथ लक्षात घेता त्या सगळ्यांना गर्दीत काम करावं लागलं होतं. त्यामुळे संसर्ग होऊ नये आणि झालाच तो पसरू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. दरम्यान,  केरळमधल्या कोझिकोड विमानतळावर झालेल्या विमान अपघातानंतर नेमकं काय झालं त्याची माहिती आता समोर आली आहे. या अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 150 जण जखमी झाले आहेत. Independence Day 2020 : पंतप्रधान मोदींसाठी लाल किल्ल्यावर 'कोरोना प्रूफ लेप' विमानतळावर तैनात असलेल्या CISFच्या जवानांनी ही माहिती दिली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. NDTVने याबाबतचं वृत्त CISFच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. रात्री 7.40 मिनिटांनी विमान धाव पट्टीवरून घसरलं आणि पुढे जाऊन त्याचे दोन तुकडे झाले. 7.41 - CISFच्या जवानांनी ही माहिती एअर ट्राफिक कंट्रोल आणि (ATC) बचाव कार्य करणाऱ्या पथकाला दिली. 7.42 – विमानतळावरच्या फायर ब्रिगेडच्या पथकाला विमानाच्या अपघाताची सूचना देण्यात आली. 7.43 – CISFच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावरच्या आरोग्य पथकाला या अपघाताची माहिती कळवली आणि तातडीने पोहोचण्याची विनंती केली. देशात कोरोनाचा उद्रेक! 24 तासांत 62 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह 7.44 – CISFच्या कंट्रोल रुममधून विमातळावरच्या सर्व अधिकाऱ्यांना ही माहिती कळविण्यात आली. शनिवारी या परिसराची केंद्रीय हवाई मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी पाहणीही केली होती. 7.45 – CISFच्या कंट्रोल रुममधून स्थानिक पोलिसांना या अपघाताची माहिती दिली गेली. घटनेच्या दिवशी सगळ्याच यंत्रणांनी तातडीने बचाव कार्याला सुरुवात केल्याने प्रवाशांचे प्राण वाचविण्यात यश मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या