पोलिसाच्या बायकोची दबंगगिरी, टोल मागितला म्हणून केली नाक्याची तोडफोड

पोलिसाच्या बायकोची दबंगगिरी, टोल मागितला म्हणून केली नाक्याची तोडफोड

नवऱ्याचा हा अपमान आहे असं वाटून ती गाडीतली काढी घेऊन खाली उतरली आणि टोल नाक्याची तोडफोड सुरू केली.

  • Share this:

कोटा 07 ऑक्टोंबर : पोलिसांच्या दादागिरीच्या अनेक बातम्या कायम येत असतात. मात्र राजस्थानातल्या कोटा जिल्ह्यात पोलिसाच्या बायकोची दबंगगिरी समोर आलीय. पोलीस असूनही आपल्या नवऱ्याचा टोल का मागितला याचा राग तीला आला त्यामुळे रागाच्या भरात ती दांडकं घेऊन घाली उतरली आणि टोल नाक्याची तोडफड केली. हा सगळा प्रकार नाक्यावरच्या CCTVमध्ये कैद झाला असून पोलिसावर कारवाईची मागणी होतेय.  कोटा जवळच्या सीमल्या टोल प्लाझा इथली ही घटना आहे. या टोल नाक्यावरून मध्य प्रदेश पोलिसांचे कॉन्स्टेबल सुमन हे आपल्या कारने जात होते. कार टोल नाक्यावरून जात असताना नेहमी प्रमाणं कर्मचाऱ्याने त्यांना टोल मागितला. मात्र त्यांनी आपण पोलीस असल्याचं त्यांनी सांगितलं. नंतरही त्या कर्मचाऱ्याने टोल मागताच त्या पोलिसाला आणि त्याच्या बायकोला राग आला.

मुलीला होती 10 वर्षांपासून केस खाण्याची सवय, पोटात निघाला 600 ग्रॅम झुपका

नवऱ्याचा हा अपमान आहे असं वाटून ती गाडीतली काढी घेऊन खाली उतरली आणि टोल नाक्याची तोडफोड सुरू केली. शेवटी पोलीस आल्याने प्रकरण शांत झालं. पोलिसांनी नाक्यावरचे कर्मचारी आणि पोलीस दाम्पत्याला स्टेशनला बोलावून चौकशी केली. दोघांनीही एकमेकांविरूद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत.

मेलेला मुलगा झाला जिवंत

राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील दुर्घटनेत मृत पावलेल्या एका युवकाच्या चुकीच्या ओळखपत्रामुळे दुसऱ्या युवकाच्या कुटूंबाला 20 दिवस दुःखात घालवावे लागले. मृत व्यक्तीजवळ जे आधार कार्ड मिळाले त्यात गल्लत केल्याने अज्ञात मुलाला आपला मुलगा मानून त्याचे अंत्यसंस्कारही केले. 12 वे सर्व विधीही पूर्ण केले. मात्र 20 दिवसांनंतर शुक्रवारी तो मुलगी घरी परतला तेव्हा कुटुंबातील सदस्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण आता ज्याचे अंत्यसंस्कार केले तो युवक कोण होता याच्या चौकशीला पोलीस लागले आहेत.

Income Tax भरणाऱ्यांसाठी 'खुशखबर' नरेंद्र मोदी सरकारने घेतला हा मोठा निर्णय

17 सप्टेंबरला जोधपुरला झाली होती दुर्घटना-

जोधपुर येथील मंडोर ठाण्याच्या जवळील मघराजजी टांका येथे ही घटना घडली. येथे एका युवकाचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला. या अपघातात युवकाच्या शरीराचे अनेक तुकडे झाले. मंडोर पोलीस ठाण्यात मृताच्या खिशातून मिळालेल्या आधारकार्डकडे पाहून त्याची ओळख ठरवण्यात आली. पोलिसांनी युवकाच्या कुटुंबियांना बोलावून त्यांच्याकडे मृतदेह सोपवला. मिळालेल्या आधार कार्डवर कुटुंबियांनीही मृतदेह ताब्यात घेतला आणि अंत्यसंस्कार केले. यानंतरच्या सर्व विधी पार पाडल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: police
First Published: Oct 8, 2019 08:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading