कोटा, 20 जून : अनेकदा माणसांच्या चुकीमुळे त्यांच्या आप्तजनांना नुकसान पोहोचते. मात्र सध्या असं एक प्रकरण समोर आलं आहे की कुटुंबीयांच्या मोठ्या चुकीमुळे 40 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या कोटा याठिकाणी ही घटना घडली. याठिकाणी सरकारी रुग्णालयामध्ये भरती एक रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. त्याच्या कुटुंबीयांनी व्हेंटिलेटरचा प्लग काढून त्याजागी कूलर लावल्यामुळे या इसमाला आपले आयुष्य गमवावे लागले आहे. पीटीआयने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्याच्या संशयावरून महाराव भीम सिंह यांना सरकारी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. 15 जून रोजी त्यांना दुसऱ्या वॉर्डात भरती करण्यात आले. त्याठिकाणी खूप उकाडा जाणवत असल्याने त्या इसमाच्या कुटुंबीयांनी तिथे कूलर सुरू केला. अशी माहिती मिळते आहे की, जेव्हा कूलर सुरू करण्यासाठी कोणता सॉकेट मिळाला नाही त्यावेळी त्यांनी व्हेंटिलेटरचा प्लग काढून तिथे कूलर लावला.
वाचा-24 तासांत रेकॉर्ड ब्रेक 14516 नवीन रुग्ण, तरी महाराष्ट्रानं दिली आनंदाची बातमी
जवळपास अर्धा तास व्हेंटिलेटर चालू राहिला. त्यानंतर डॉक्टरांना सूचना देण्यात आली. रुग्णावर त्यांनी सीपाआरचा वापरून देखील काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालयामध्ये मोठा गोंधळ उडाला होता. रुग्णालय अधीक्षक डॉ. नवीन सक्सेना यांनी अशी माहिती दिली आहे की, तीन सदस्यीय समिती या घटनेची चौकशी करणार आहे. यामध्ये रुग्णालयाचे उपाधीक्षक, नर्सिंग अधीक्षक आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे. शनिवारपर्यंत या घटनेचा रिपोर्ट येणार आहे.
वाचा-घरून निघाली वरात, अर्ध्या रस्त्यातच कोरोना रिपोर्ट घेऊन आले अधिकारी आणि...
दरम्यान रुग्णालयातील इतर अधिकाऱ्यांकडून अशी माहिती मिळाली की रुग्णाच्या कुटुंबीयांनी कूलर लावण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. एवढच नव्हे तर त्यांनी असा आरोप केला आहे की मृतकाच्या कुटुंबीयांनी स्टाफबरोबर गैरवर्तन केले. त्यावेळी ड्यूटीवर असणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांबरोबर त्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप होत आहे. या घटनेचा तपास अद्याप सुरू आहे. या साऱ्या प्रकारात त्या रुग्णाने मात्र अवघ्या 40व्या वर्षी त्याचे प्राण गमावले आहेत.
वाचा-कोरोनाच्या लढ्यात व्यापाऱ्याचं योगदान; कोरोनाग्रस्तांसाठी दिली 19 मजली इमारत
संपादन-प्रियांका गावडे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.