• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • तरुणाला ओलीस ठेवून काकीनं पाजलं स्वतःच Urine, मारहाण करत काकानं शूट केला Video

तरुणाला ओलीस ठेवून काकीनं पाजलं स्वतःच Urine, मारहाण करत काकानं शूट केला Video

अतिशय लाजिरवाणी घटना घडली आहे. एका जोडप्याने एका तरुणाला ओलीस ठेवून बेदम मारहाण केली आहे.

 • Share this:
  राजस्थान, 23 सप्टेंबर: कोटामध्ये (Kota)अतिशय लाजिरवाणी घटना घडली आहे. एका जोडप्याने एका तरुणाला ओलीस ठेवून बेदम मारहाण केली आहे. . नंतर महिलेनं त्याला लघवी (Urine) प्यायला लावली. हे दाम्पत्य पीडित तरुणाचे काका-काकी असल्याचं सांगण्यात येत आहे. महिलेच्या पतीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोटा पोलिसांनी आरोपी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. पेगासस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SC चा मोठा निर्णय व्हायरल झालेला व्हिडिओ शहरातील अनंतपुरा भागात राहणाऱ्या एका तरुणाचा असल्याची माहिती कोटा एडिशनल एसपी प्रवीण जैन यांनी दिली. पुढे त्यांनी सांगितलं की, त्या तरुणाला एका जोडप्यानं ओलीस ठेवलं होतं. हा तरुण या जोडप्याला काका आणि काकू असल्याचं सांगत आहे. या घटनेत तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला ज्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्या महिलेनं तरुणाला लघवी प्यायला लावली. महिलेचा पती होमगार्डमध्ये असल्याचे सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणात, आता आरोपी जोडप्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. IPL 2021: श्रेयस अय्यरनं दिल्लीच्या कॅप्टनसीवर मौन सोडलं, पंतबाबत केलं मोठं वक्तव्य  तरुणावर बलात्काराचा आरोप मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ 14 सप्टेंबरचा असल्याचे सांगितलं जात आहे. आतापर्यंतच्या पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे समोर आलं आहे की, ज्या तरुणाला ओलीस ठेवण्यात आलं होतं. जो व्हिडिओमध्ये दिसत आहे, त्याने त्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. हा तरुण अजूनही तुरुंगात आहे.आता त्याच्या जबाबानंतर पुढील कारवाई केली जाईल. प्राथमिदृष्ट्या हे प्रकरण अवैध संबंधांशी संबंधित असल्याचं मानलं जातं आहे. अनंतपुरा पोलीस स्टेशन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. IPL 2021: अश्विनची बॉलिंग पाहून गंभीर नाराज, अनुभवी बॉलरला दिला 'हा' सल्ला तरुणाच्या भावानं सांगितली वेगळी कहाणी दुसरीकडे, ओलीस ठेवलेल्या युवकाच्या मोठ्या भावानं पोलिसांना याबाबत वेगळीच गोष्ट सांगितली आहे. त्याच्या भावानं दावा केला की, जगपुरा गावात राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या भावाला त्यांच्या घरी बोलावले आणि त्याला ओलीस ठेवलं. नंतर हात -पाय बांधून त्याला रात्रभर कोंडून ठेवलं.
  Published by:Pooja Vichare
  First published: