Home /News /national /

आईसमोर चिमुकल्यांचा जातोय जीव, राजस्थानात 72 तासांमध्ये 102 मुलांचा मृत्यू

आईसमोर चिमुकल्यांचा जातोय जीव, राजस्थानात 72 तासांमध्ये 102 मुलांचा मृत्यू

या घटनेवरून भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीका केलीय. गोरखपूरला अशीच घटना घडली होती तेव्हा राहुल आणि प्रियंका गांधी यांनी त्याचं राजकारण केलं होतं. आता ते का गप्पा आहेत असा सवाल भाजपने विचारलाय.

    जयपूर 02 जानेवारी : राजस्थानात लहान मुलांच्या होत असलेल्या मृत्यूंमुळे सर्व देशात खळबळ उडालीय. काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये अशीच घटना घडली होती. त्यातही 100 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाला होता. राजस्थानमधल्या कोटा शहरातल्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये अज्ञात तापाने मुलांचा मृत्यू होत आहे. गेल्या 72 तासांमध्ये तब्बल 102 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या तापाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. हा नेमका कुठला आजार आहे याचं निदान झालेलं नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येतेय. उत्तर प्रदेश, बिहारसह काही राज्यांमध्ये अशा प्रकारच्या घटना दरवर्षी घडत असतात. मात्र अजुनही त्यावर राज्य आणि केंद्र सरकारला तोडगा शोधता आलेला नाही. मुलांसोबत आलेल्या मातांना आपल्या मुलांचा मृत्यू डोळ्यासमोर पाहावा लागत असल्याने या हॉस्पिटल्समधला त्यांच्या आक्रोश हा ह्रदय पिळवटून टाकणारा आहे. कोटामधल्या जे. के. लोन या एकाच हॉस्पिटलमध्ये 11 मुलांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलंय. लहान मुलांना सुरुवातीला ताप येतो आणि काही दिवसांमध्येच तो गंभीर रुप धारण करतो. मुलांची प्रतिकारशक्ती झपाट्याने खालावते आणि एक एक अवयव काम करणं बंद करतो. हा ताप मेंदूपर्यंत जात असल्याने लहान मुलांची प्रकृती लगेच खालावते असंही काही डॉक्टरांनी सांगितलंय. महाराष्ट्राच्या चित्ररथाला दिल्लीच्या परेडमध्ये केंद्राने परवानगी नाकारली या प्रकरणाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून केंद्रीय आरोग्यंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहेलोत यांना पत्र लिहून केंद्राकडून मदत करण्याचं आश्वासन दिलंय. तर यावरून आता राजकारणही सुरू झालंय. या घटनेवरून भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीका केलीय. गोरखपूरला अशीच घटना घडली होती तेव्हा राहुल आणि प्रियंका गांधी यांनी त्याचं राजकारण केलं होतं. आता ते का गप्पा आहेत असा सवाल भाजपने विचारलाय.  
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या