मराठी बातम्या /बातम्या /देश /शिक्षकाला विद्यार्थ्यांनी घडवली अद्दल; रात्री तरुणीला आणलेलं खोलीत अन् सकाळी झाली भंडाफोड

शिक्षकाला विद्यार्थ्यांनी घडवली अद्दल; रात्री तरुणीला आणलेलं खोलीत अन् सकाळी झाली भंडाफोड

एका शिक्षकाने तरुणीला आदिवासी मुलांच्या विद्यार्थी वसतीगृहात बोलावलं होतं. तिथं विद्यार्थ्यांनी शिक्षकासह तरुणीला आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं.

एका शिक्षकाने तरुणीला आदिवासी मुलांच्या विद्यार्थी वसतीगृहात बोलावलं होतं. तिथं विद्यार्थ्यांनी शिक्षकासह तरुणीला आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं.

एका शिक्षकाने तरुणीला आदिवासी मुलांच्या विद्यार्थी वसतीगृहात बोलावलं होतं. तिथं विद्यार्थ्यांनी शिक्षकासह तरुणीला आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

कोरबा, 26 जानेवारी : शाळेत ज्ञानदानाचं कार्य करायचं सोडून एका तरुणीसोबत चाळे करणं शिक्षकाला महागात पडलं आहे. छत्तीसगढमधील कोरबा जिल्ह्यातल्या एका शिक्षकाने तरुणीला आदिवासी मुलांच्या विद्यार्थी वसतीगृहात बोलावलं होतं. तिथं विद्यार्थ्यांनी शिक्षकांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं आणि रूमला बाहेरून कुलुप लावलं. त्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस विद्यार्थी वसतीगृहात येऊन शिक्षकासह तरुणीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात गेले. दरम्यान, या प्रकाराची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठांना मिळाल्यानंतर जिल्हा शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सहायक शिभक प्रदीप कुमार टोप्पो हे रात्री साडे नऊच्या सुमारास प्री मॅट्रिक आदिवासी विद्यार्थी वसतीगृहात एका तरुणीला घेऊन आले होते. रात्री साडे अकराच्या सुमारास शिक्षकाचा हा प्रताप विद्यार्थ्यांना समजला. तेव्हा विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि तरुणी ज्या खोलीत होती त्याला बाहेरून कुलुप लावून पोलिसांना कळवले. पसान पोलिस ठाण्याच्या पथकाने २२ जानेवारीला शिक्षकाच्या खोलीचं दार उघडलं आणि तरुणीसह त्यांना पोलिस ठाण्यात आणलं.

हेही वाचा : पतीच्या मृत्यूनंतर दुसरं लग्न, मात्र काही दिवसात सून परतली अन् सासऱ्यासोबतच लग्नाचा घाट

सहायक शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातच केलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली. तसंच आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्यानंतर शिक्षण विभागावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकरावर निलंबनाची कारवाई केली आहे. आता या प्रकरणाची अधिक चौकशी पोलिस करत आहेत.

First published:

Tags: Viral