गणपतीची पूजा करण्यासाठी घरातून पळाली 2 मुस्लीम मुलं, रस्त्यावर वर्गणी मागून बसवला बाप्पा!

गणपतीची पूजा करण्यासाठी घरातून पळाली 2 मुस्लीम मुलं, रस्त्यावर वर्गणी मागून बसवला बाप्पा!

जाती-धर्माच्या पलीकडे जात छत्तीसगडमधील कोरबाच्या दोन मुस्लीम मुलांनीही गणेशमूर्ती बसवून जातीय एकतेचं उदाहरण जगासमोर ठेवलं आहे.

  • Share this:

छत्तीसगड, 05 सप्टेंबर : लहानपणात मुलांना जात-धर्म असं काहीही माहिती नसतं हेच खरं आहे. लहानपण हे सगळ्यात निरागस आणि खरं असतं. छत्तीसगडमध्ये याचं उत्तम उदाहरण समोर आलं आहे. जाती-धर्माच्या पलीकडे जात छत्तीसगडमधील कोरबाच्या दोन मुस्लीम मुलांनीही गणेशमूर्ती बसवून जातीय एकतेचं उदाहरण जगासमोर ठेवलं आहे. गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी घरच्यांनी विरोध केला पण तरीदेखील मुलं घरातून पळून गेले आणि बाप्पाची पूजा केली. हे कळताच पोलिस आणि चाइल्ड लाइन पथकाने दोन्ही मुलांना शोधून काढलं आणि त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन केलं.

ही एखाद्या सिनेमाची कथा नाही तर कोरबाच्या माणिकपूर चौकी परिसरातील कुंभघाट इथल्या रहिवासी रमजान आणि मुबारक या दोन मित्रांची खरी कहानी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी दोन्ही मुलं घरातून पळून गेली. घराबाहेर पळून गेल्यानंतर त्यांनी शारदा विहार रेल्वे गेटपासून थोड्या अंतरावर असलेल्या फुटपाथावर झोपडपट्टीसारखा मंडप बांधला आणि त्यामध्ये गणेशाची मूर्ती स्थापण केली. त्यासाठी त्यांनी शारदा विहार परिसरातून देणगीही घेतली. विशेष म्हणजे शारदा विहार परिसरातील लोक दोन्ही मुलांना ओळखत नाहीत.

वस्तीतल्या लोकांनी दिलं जेवण...

या लहान मुलांनी गणपती बसवला त्याची पूजा केली. त्यामुळे वस्तीतल्या लोकांनीही त्यांना मदत केली. वस्तीतली लोकही दोन्ही मुलांना दोन वेळेस जेवण द्यायचे. हे दोघेही मंडपात झोपायचे आणि बाप्पाची काळजी घ्यायचे. दरम्यान, अचानक घरातून दोन मुलं बेपत्ता झाल्याने नातेवाईक घाबरून गेले. त्यांनी मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. रमजानच्या वडिलांनी बेपत्ता होण्याच्या एक दिवसाआधीच त्याला मारलं होत. यामुळे त्यांना रमजानची काळजी वाटत होती. तपासादरम्यान त्याचा मित्र मुबारकही घरी नसल्याचे निदर्शनास आले. ही माहिती कुणीतरी पोलिस आणि चाइल्ड लाइन टीमला दिली. पोलिसांच्या मदतीने या दोघांनीही शोधण्यात आलं आणि नंतर त्यांना कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं.

या दोघा मित्रांना बाप्पा स्वप्नात दिसतात

रमजानने सांगितले की, त्यांना स्वप्नात गणेश बाप्पा दिसतात. तेव्हापासून गणपती बाप्पा बसवण्याची त्यांची इच्छा होती. पण घरातले यासाठी परवानगी देणार नाही याची त्यांनी कल्पना होती. त्यामुळे त्यांनी पळून जाऊन दुसरीकडे बाप्पा बसवण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात विशेष म्हणजे त्यांना या कामात इतर लोकांनी मदत केली. त्यांच्या या कामाचं सगळीकडून कौतूक करण्यात येत आहे.

VIDEO : दुकानाबाहेर साड्या पाहत होत्या महिला, बैलाने मागून येऊन दिली धडक

First published: September 5, 2019, 4:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading