संबंध ठेवल्यानंतर प्रेयसीने मागितले 500 रूपये, प्रियकराने दगडाने ठेचून संपवलं आयुष्य!

संबंध ठेवल्यानंतर प्रेयसीने मागितले 500 रूपये, प्रियकराने दगडाने ठेचून संपवलं आयुष्य!

त्याने 500 रुपये देण्यास नकार दिल्यानंतर या महिलेनं त्याच्या नातेवाईकाला आपल्या प्रेमसंबंधाबद्दल सांगण्याची धमकी दिली होती

  • Share this:

 

कोरबा, 16 डिसेंबर : छत्तीसगड (Chhattisgarh) येथील कोरबा (Korba) जिल्ह्यात एका महिलेच्या मृतदेहाचं अखेर गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. प्रियकरानेच या महिलेचा खून केला असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे, फक्त 500 रूपयांसाठी या महिलेची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ग्राम अखरपाली इथं राहणाऱ्या एका महिलेचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह हा तिच्या घरापासून काही अंतरावर शेतामध्ये आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. परंतु, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अखेर गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे.

मृत महिलेचं आरोपी चंद्र विजय नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पोलिसांनी जेव्हा चंद्र विजयला ताब्यात घेतलं तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. महिलेची हत्या करण्याआधीच दोघांमध्ये शारिरिक संबंध झाले होते. त्यानंतर या महिलेनं चंद्र विजयकडे 500 रुपये मागितले. पण त्याने देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला.

घराची चावी हरवली म्हणून गर्लफ्रेंडच्या घरी राहिला, झोपेतच केला बलात्कार

कोरबाचे सीएसपी राहुल देव शर्मा यांनी सांगितलं की, 500 रुपयांसाठी ही हत्या झाली. या आरोपीने 500 रुपये  देण्यास नकार दिल्यानंतर या महिलेनं त्याच्या नातेवाईकाला आपल्या प्रेमसंबंधाबद्दल सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे चंद्र विजय हा महिलेवर संतापला आणि त्याने मारहाण केली. मारहाणीतून त्याने महिलेचा गळा घोटला यात तिचा मृत्यू झाला.  चंद्र विजय एवढ्यावर थांबला नाही. तर त्याने महिलेची ओळख पटू नये म्हणून तिच्या चेहरा दगडाने ठेचून काढला.

असा पकडला गेला आरोपी

ज्या ठिकाणी या महिलेचा मृतदेह सापडला होता तिथे पोलिसांनी पोहचून पंचनामा केला. यावेळी पोलिसांच्या श्वानाने माग काढत आरोपीच्या घराजवळ येऊन थांबला. त्यानंतर पोलिसांनी चंद्र विजयला ताब्यात घेतलं.  चौकशी दरम्यान, त्याने खून केला असल्याचं कबूल केलं. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोस्टमार्टमच्या अहवालानंतर बलात्काराचा गुन्हा केला जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2019 07:07 PM IST

ताज्या बातम्या