10 हजाराच्या लीडवर जल्लोष केला नंतर 26 हजारांनी झाला पराभव

10 हजाराच्या लीडवर जल्लोष केला नंतर 26 हजारांनी झाला पराभव

लोकसभा निवडणुकीत अनेक हायप्रोफाईल मतदारसंघात दिग्गजांनी विजय मिळवला तर काहींचा पराभव झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 मे: लोकसभा निवडणुकीत अनेक हायप्रोफाईल मतदारसंघात दिग्गजांनी विजय मिळवला तर काहींचा पराभव झाला. छत्तीसगडमधील सर्वात हायप्रोफाईल असलेल्या कोरबा या मतदारसंघात काँग्रेसचा विजय झाला तर भाजपचा पराभव. काँग्रेसच्या ज्योत्सना महंत यांनी भाजपच्या ज्योतिनंद दुबे यांचा 26 हजारहून अधिक मतांनी पराभव केला.

वाचा- मोदी लाटेत विरोधकांची तब्येत बिघडली, डॉक्टरांना अच्छे दिन !

कोरबा लोकसभेतील मतमोजणीत दुबे यांनी सकाळपासून मोठी आघाडी घेतली होती. एक वेळ अशी आली ही दुबे यांच्याकडे 10 हजाराची उमेदवारी होती. त्यामुळे दुबे यांच्या समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. मतमोजणी केंद्रावर ढोल वाजवण्यास सुरुवात झाली. कार्यकर्त्यांनी मिठाई देखील वाटली. पण काही मतमोजणी दरम्यान पाली तानाखार आणि रामपूर येथील ईव्हीएमची मतमोजणी सुरु झाली आणि दाव उलटा झाला. काही वेळातच काँग्रेस मते वाढू लागली आणि त्यांनी 25 हजारांची आघाडी घेतली. यामुळे भाजपच्या जल्लोषा रुपांतर सन्नाट्यात झाले. काँग्रेसला पालीमधून 61 हजार आणि 29 हजार मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसच्या महंत यांना मोठी आघाडी मिळाली. दुबे यांना त्यांच्या स्वत:च्या विधानसभा मतदारसंघात साडेचार हजार मते कमी मिळाली.

ज्योत्सना या छत्तीसगड विधानसभेचे अध्यक्ष डॉ.चरणदास महंत यांच्या पत्नी आहेत. 2009मध्ये त्यांनी कोरबा मधून विजय मिळवला होता. छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या 11 जागा असून त्यापैकी 9 जागांवर भाजपने विजय मिळवला तर दोन जागांवर काँग्रेसला यश मिळाले आहे.

अमित शहा यांना भाजपचे 'चाणक्य' का म्हणतात? पाहा SPECIAL REPORT

First Published: May 24, 2019 11:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading