वाचा-तोंडाला प्लास्टिक बांधून अभिनेत्रीनं केलं असं काही की, VIDEO पाहून उडेल थरकाप या महिलेने औषधे घेण्यासाठी बाहेर पडल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी बिल दाखवण्यास सांगितल्यानंतर तिनं पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला आम्ही काही प्रश्न विचारले. मात्र ती तिच्या वाहनातून खाली उतरली आणि आमच्या एका सहकाऱ्यावर हल्ला केला. त्यानंतर आमच्याशी भांडण करण्यास सुरुवात केली, असे सांगितले. दरम्यान व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पोलिसावंर केलेल्या हल्ल्यानंतर पोलिसाच्या शर्टावर रक्ताचे डागही दिसत आहे. या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा-ट्रकवर उभारले जातेय शवगृह, लवकरच 'या' शहरात पडणार मृतांचा खच एकीकडे भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 600हून जास्त झाली आहे. त्यामुळं कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉक डाऊन घोषित केला. मात्र लोकांनी याकडेही गांभीर्याने पाहत नाही आहेत. वाचा-सावधान! फक्त 20 मिनिटांत पसरतोय कोरोना, घरातच थांबा नाहीतर... 20 मिनिटांत पसरतोय कोरोना केरळमध्ये बुधवारी (25 मार्च) 20 मिनिटांत 4 जणांना व्हायरसची लागण झाली. म्हणजे कोरोना किती जलद गतीने पसरत आहे, याचा अंदाज बांधता येऊ शकतो. भारतात कोरोना अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळं सध्या कोरोना हा परदेशातून येणाऱ्या व्यक्तींना होत आहे. मात्र जर कोरोनाग्रस्त व्यक्ती इतरांच्या संपर्कात आल्यास, याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. त्यामुळं लोकांना घरतच राहण्याचे आवाहन सतत केले जात आहे. याआधी मोदींनी 22 मार्च रोजी एका दिवसाचा लॉक डाऊन जाहीर केला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी लोकांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर गर्दी केली. त्यामुळं आता 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे.WTF this DESPICABLE Woke #COVIDIOT when stopped by police abused & spit on Kolkata Police Cop 😠😡 #COVIDIDIOTS #COVIDIOTS #coronavirusindia #21daylockdown pic.twitter.com/Q1P8RcVtZw
— Rosy (@rose_k01) March 25, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona