ममता Vs मोदी : कडेकोट बंदोबस्तात दीदींचा 'विरोध मार्च'

लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 15, 2019 07:42 PM IST

ममता Vs मोदी : कडेकोट बंदोबस्तात दीदींचा 'विरोध मार्च'

कोलकाता, 15 मे : लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. मंगळवारी (15 मे ) कोलकातामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या रोड शोदरम्यान त्यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. यानंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे समर्थक आमने-सामने आले. यादरम्यान, तुफान दगडफेक, जाळपोळदेखील करण्यात आली.या संपूर्ण घटनेला विरोध दर्शवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोध मार्च काढला. बेलिया घाट ते शाम बाजारपर्यंत बॅनर्जींनी हा मार्च काढला. यापूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पश्चिम बंगालमध्ये जाहीरसभादेखील झाली.Loading...

मंगळवारी झालेला हिंसाचार पाहता ममतांच्या रोड शोदरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वाचा :VIDEO : भाजपला उत्तर देत ममतादीदीही उतरल्या रस्त्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दीदींवर गंभीर आरोप

ममतांच्या रोड शोपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बशिरहाट इथं जाहीर सभा घेऊन ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.  पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'इंच इंचाचा बदला घेऊ अशी घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली होती. अमित शहा यांच्या रोड शोवर हल्ला करून त्यांनी बदला घेतला आणि 24 तासात आपली घोषणा खरी करून दाखवली', असा आरोपही त्यांनी केला.

'ममता बॅनर्जी यांची सत्ता आता संपणार आहे. ममतांच्या जुलमी राजवटीपासून इथल्या लोकांची सुटका होणार आहे. 23 मेची वाट पाहा, लोकांचा निर्णय तुम्हाला कळेल' असंही ते म्हणाले.

वाचा :वाराणसीतील रोड शोमध्ये प्रियंका गांधींच्या डोक्याला दुखापत

'बंगालचा 'बगदीदी' करण्याचा ममता बॅनर्जींचा प्रयत्न'

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालचं 'बगदीदी' बनायचं आहे, असा गंभीर आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

इस्लामिक स्टेटचा प्रमुख बगदादी यांच्या प्रभावाने तुम्हाला बंगालचा बगदीदी व्हायचं आहे का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. बंगालमध्ये लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. बंगाल हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्याला आम्ही मुख्य प्रवाहापासून तोडू देणार नाही असंही योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


VIDEO: 'तू झक्कास दिसतेस' म्हणताच तरुणीने युवकाला चपलेनं धुतलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 15, 2019 07:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...