कोलकाता, 29 एप्रिल : कोरोना व्हायरसने जगभर हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दरम्यान, कोरोनामुळे काही धक्कादायक गोष्टीही घडत आहेत. कोलकात्यातील एका रुग्णाबाबत अजब प्रकार घडला. सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह असा रिपोर्ट आल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेलं पण तिथून निगेटिव्ह असल्याचं घरी सोडलं. त्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह रिपोर्ट असल्याचं सांगत रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यानंतर ते परतलेच नाहीत.
याबाबत संबंधित व्यक्तीच्या मुलाने सांगितलं की, आम्हाला रुग्णालयातून वडिलांना नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स येत असल्याची माहिती मिळाली. तो एक धक्काच होता कारण 24 तास आधीच ते ठणठणीत असल्यानं रुग्णालयाने सांगून घरी सोडलं होतं. वडिलांना कोरोना नाही असंही सांगण्यात आलं होतं. मात्र पुन्हा रुग्णालयात नेल्यानंतर कोरोना चाचणीवेळी गडबड झाल्याचं सांगत रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं.
दरम्यान, मुलाने सोमवारी वडिल दुसऱ्यांदा रुग्णालयात जाण्यापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ शूट केला. त्यानंतर रुग्णालयात गेलेले वडील पुन्हा घरी परतलेच नाहीत. रुग्णालयात दाखल केल्यानंतर 12 तासांच्या आतच त्यांचा मृत्यू झाला. मुलगा म्हणाला की, माझे वडील रुग्णालयात होते. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून घरीच क्वारंटाइन होण्यास सांगितलं होतं. मात्र पुढच्याच दिवशी रिपोर्ट निगेटिव्ह आहेत आणि घरी घेऊन जाऊ शकता असं म्हणाले. त्याबाबतचं सर्टिफिकेटही देण्यात आलं.
हे वाचा :
लॉकडाऊन करूनही चीन, इटलीला जमलं नाही ते भारताने केलं, 30 दिवसांत काय झालं?
रिपोर्ट निगेटिव्ह आले म्हणून वडिलांना घरी आणल्यानंतर आरोग्य विभागाने त्यांना पुन्हा फोन केला. त्यावेळी रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचं सांगण्यात आलं. घरच्यांनी या घटनेनंतर प्रश्न विचारला की, जो माणूस चालत घरी आला त्याचा मृत्यू कसा होऊ शकतो? हा बेजबाबदारपणा आहे. वडिलांची हत्या करण्यात आली असून मला रुग्णालय आणि आरोग्य मंत्रालयाकडून उत्तर पाहिजे. कुटुंबाला भरपाई मिळावी अशी मागणीही मुलाने केली आहे.
हे वाचा : लॉकडाऊनमध्ये बाल्कनीत उभा राहिला 13 वर्षांचा मुलगा, पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू
याप्रकरणी आरोग्य विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. मृत व्यक्तीच्या कुटुंबाची 3 मे रोजी कोरोना टेस्ट करण्यात येईल. गेल्याच आठवड्यात मृत व्यक्तीला ताप आणि खोकल्याचा त्रास झाला होता. त्यानंतर एका सरकारी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. तिथं पहिल्यांदा रिपोर्ट पॉझिटिव्ह आणि नंतर निगेटिव्ह आले. तेव्हा घरीही सोडण्यात आलं मात्र दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह रिपोर्ट असल्याचे सांगत पुन्हा रुग्णालयात नेलं होतं. शेवटी रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाला.
पाहा :
VIDEO : रिअल लाइफ हीरो! 84 तास ड्रायव्हिंग करत 3000 किमी दूर पोहोचवला मृतदेह
संपादन - सूरज यादव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.