कोलकाता, 21 डिसेंबर : कोलकाता महानगरपालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचे निकाल (Kolkata Municipal Corporation Election result) आता समोर आले आहेत. या निवडणुकीत सुद्धा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसची (TMC) जादू कायम असल्याचं दिसत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घतेल्याचं पहायला मिळत आहे. (Big jolt for BJP and Congress in Kolkata Municipal Corporation Election 2021)
144 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत 134 जागांवर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. यामुळे निवडणुकीत ममता बॅनर्जी क्लीन स्वीप देतील असं बोललं जात आहे. 19 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात एकूण 64 टक्के मतदान झाले होते. मतमोजणी अद्यापही सुरू आहे अंतिम निकाल येण्यास आणखी थोडा वेळ लागणार आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने घेतलेल्या आघाडीवरुन एकहाती सत्ता मिळवणार हे निश्चित मानलं जात आहे.
न्यूज एजन्सी एएनआयने केलेल्या ट्विटनुसार, तृणमूल काँग्रेसने सात जागांवर विजय मिळवला आहे. तर 108 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे. सीपीआय (एम) 2 जागांवर, काँग्रेस दोन जागांवर आणि अपक्ष तीन जागांवर आघाडीवर आहे.
#KolkataMunicipalElection2021 results | TMC wins 7 and leads on 108. BJP leads on 4, CPI(M) on 2, Congress on 2, Independent 3, as per official trends by West Bengal State Election Commission.
— ANI (@ANI) December 21, 2021
एकूण जागा - 144
तृणमूल काँग्रेस - 108 जागांवर आघाडी
भाजप - 4 जागांवर आघाडीवर
काँग्रेस - 2 जागांवर आघाडीवर
डावे पक्ष - 2 जागांवर आघाडी
इतर - 3 जागांवर आघाडी
भारतीय जनता पक्षाला पुन्हा झटका
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीतही ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर आता कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीतही तृणमूल काँग्रेसने विजय मिळवत भाजपला जोरदार धक्का दिला आहे.
ममता बॅनर्जींचा विक्रमी मतांनी विजय
पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा नंदीग्राम मतदारसंघात पराभव झाला. तेव्हा भाजपचे उमेदवार सुवेंदु अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर मुख्यमंत्रिपदावर कायम टिकून राहण्यासाठी ममता यांना 6 महिन्यांच्या आत आमदार होणं गरजेचं होतं. त्यानंतर भवानीपूर येथून ममता बॅनर्जी यांनी निवडणूक लढवली. ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांचा पराभव झाला. भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्यात. ममता बॅनर्जी यांचा विक्रमी मतांनी विजय झालाय.
ममता बॅनर्जी यांनी प्रियंका टिबरेवाल यांचा 58 हजार 832 मतांनी पराभव केला होता. भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत 58 हजार 832 मतांनी ममता बॅनर्जी यांनी विजय मिळवला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Kolkata, Mamata banerjee, TMC, काँग्रेस