...म्हणून नर्सनं पाजलं नवजात बाळाला दूध, कारण वाचून तुम्हीही कराल सलाम

...म्हणून नर्सनं पाजलं नवजात बाळाला दूध, कारण वाचून तुम्हीही कराल सलाम

कोरोनाच्या संकट काळात पुढचा मागचा विचार न करता या परिचारिकेनं केलेल्या या पुण्याच्या कामाचं कौतुक होत आहे.

  • Share this:

कोलकाता, 01 जून: देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात नवजात बालकांचा जन्मही होत आहे. त्यामुळं आई आणि बाळ दोघांनाही अशा परिस्थितीत कोरोनाचा धोका वाढला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधील एका रुग्णालयात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. या रुग्णालयात एक महिलेनं बाळाला जन्म दिला मात्र कोरोनाच्या भीतीनं आईनं बाळाला हात लावण्यास नकार दिला. एवढंच नाही तर बाळाता दूधही पाजलं नाही. अखेर याच रुग्णालयात काम करणाऱ्या एका परिचारिकेनं बाळाला दूध पाजलं. कोरोनाच्या संकट काळात पुढचा मागचा विचार न करता या परिचारिकेनं केलेल्या या पुण्याच्या कामाचं कौतुक होत आहे.

या महिलेची सिजेरिअन डिलिव्हरी झाल्यामुळं ती बाळाला दूध पाजू शकत नव्हती. तर, या परिचारिकेनंही काही दिवसांपूर्वीच  बाळाला जन्म दिला होता. त्यामुळे नवजात बालक भुकेनं व्याकुळ झालेलं नर्सला पहावलं नाही, अखेर तिनेच त्या बाळाला दूध पाजलं.

वाचा-7 दिवसांत 48 हजार नवीन रुग्णांची नोंद, तरी भारतासाठी एक दिलासादायक बातमी

कोरोनाची लागण होण्याच्या भीतीनं बाळाला केला नाही स्पर्श

कोरोनाचा प्रसार होण्याची भीती लहान नवजात बालकांमध्ये जास्त असल्यामुळं या बाळाच्या घरच्यांनी त्याला हात लावला नाही. त्यामुळं भीतीपोटी या बाळाला दूधही पाजलं गेलं नाही. या वॉर्डमध्ये अशा अनेक महिला होत्या, ज्यांची डिलिव्हरी झाली होती. मात्र सगळ्यांच्या मनात एकच भीती होती.

वाचा-करून दाखवलं! आदित्य ठाकरेंनी दिली मुंबईतील 'या' परिसराबद्दल Good News

परिचारिकेला आहे 8 महिन्यांचा मुलगा

दुसरीकडे या नर्स सर्व लहान मुलांची आई झाल्या आहे. कोरोना योद्धा असलेल्या या नर्सला 8 महिन्यांचा मुलगा आहे. अशा परिस्थितीतही त्या बाळाला एकटं सोडून आपलं कर्तव्य बजावत आहेत. यापरिचारिकेनं हायजीन प्रोटोकॉल पाळत या बाळाला दूध पाजलं. या घटनेनंतर सर्वत्र या परिचारिकेच्या कामाचं कौतुक केलं जात आहे.

रुग्णालयातही सापडले आहेत कोरोना रुग्ण

ज्या रुग्णालयात या बाळाचा जन्म झाला, तेथे तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळं वैद्यकिय कर्मचाऱ्यांपासून ते नवजात बाळांपर्यंत सर्वांची जास्त काळजी घेतली जाते. तर कोलकातामध्ये आतापर्यंत 2125 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर, 209 लोकांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये 5501 रुग्ण आहेत. यातील 3027 लोकांवर उपचार सुरू आहेत तर 2157 रुग्ण निरोगी झाले आहेत.

वाचा-पुणेकरांसाठी कसा असेल लॉकडाऊन 5.0, या नियमांसह आज येणार नवा आदेश

संकलन, संपादन-प्रियांका गावडे.

First published: June 1, 2020, 11:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading