कोंबड्यांची झुंज आणि मालकाचा मृत्यू, असं प्रकरण ज्यात आरोपी समोर असून नाही पकडू शकले पोलीस

कोंबड्यांची झुंज आणि मालकाचा मृत्यू, असं प्रकरण ज्यात आरोपी समोर असून नाही पकडू शकले पोलीस

मृत्यू कसा कोणाला गाठू शकतो, हे काही सांगता येत नाही. असाच प्रकार कोलकातामध्ये घडला.

  • Share this:

कोलकाता, 23 फेब्रुवारी : मृत्यू कसा कोणाला गाठू शकतो, हे काही सांगता येत नाही. असाच प्रकार कोलकातामध्ये घडला. सध्या देशाच्या वेगवेगळ्या भागातील कोंबड्याच्या झुंजी लढवल्या जात आहे. मात्र कोंबड्यांच्या या झुंजीत चक्क एका मालकाचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात असाच काहीसा प्रकार घडला. 25 वर्षीय असीम महताऊचा कोंबड्यांच्या लढाई दरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंबड्यांच्या झुंजीचे आयोजन दरवर्षी बेकायदेशीररित्या केले जाते. तर, मृत असीमच्या घरच्यांनी पोलिसांनी याविरुद्ध आवाज उठवत या स्पर्धा थांबवल्या का नाहीत, असा सवाल विचारला आहे.

वाचा-हेच बाकी राहिलं होतं! Coronavirus होऊ नये म्हणून प्रवाशाने विमानात केला कहर

वाचा-कुणीतरी फेकून दिलेली चपाती त्यानं धुवून खाल्ली, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

असा झाला मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावात कोंबड्यांच्या झुंजीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, असीम महतोही यावेळी आपली कोंबडी घेऊन तेथे पोहोचला. जवळ उभे राहून तो त्याच्या कोंबडीला प्रोत्साहन देत होता. या झुंजीत त्याच्या कोंबड्याने बाजीही मारली. यावेळी पराभूत झालेला कोंबडा घरी घेऊन जात असताना अचानक असिमवर कोंबड्याने हल्ला केला. कोंबडीच्या पायात धारदार ब्लेड बांधले होते, त्यामुळं असीमची मान चिरली गेली, यात त्याचा जागीच मृत्यू झाला. गंभीर अवस्थेत पुरुलिया येथील रूग्णालयात असीमला दाखल करण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वाचा-9 वर्षाच्या मुलाने घातलेलं Maths Challange, बघा तुम्हाला सुटतंय का?

वाचा-युजवेंद्र चहलचा शर्टलेस व्हिडीओ VIRAL, 'साकी-साकी' गाण्यावर केला डान्स

कोबड्यांच्या झुंजीचे बेकायदेशीर नियोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात बेकायदेशीरपणे अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. मृत कोंबडा विजेत्या मालकाला पुरस्कार म्हणून दिला जातो. जानेवारीमध्ये आंध्र प्रदेशातून कोंबडीच्या लढाईत एका व्यक्तीच्या मृत्यूची बातमी आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2020 01:57 PM IST

ताज्या बातम्या