प्रियांकांच्या टीममध्ये मराठी चेहरा, कोल्हापूरचे खाडे युपीत चमक दाखवणार

प्रियांकांच्या टीममध्ये मराठी चेहरा, कोल्हापूरचे खाडे युपीत चमक दाखवणार

काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असणाऱ्या बाजीराव खाडे यांना काँग्रेसच्या उत्तर प्रदेश (पूर्व) सचिव पदाची जबाबदारी दिली आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर,कोल्हापूर, 20 फेब्रुवारी : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या टीममध्ये कोल्हापूरचे बाजीराव खाडे यांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असणाऱ्या बाजीराव खाडे यांना काँग्रेसच्या उत्तर प्रदेश (पूर्व) सचिव पदाची जबाबदारी दिली आहे.

प्रियंका गांधी यांची अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व विभागाची जबाबदारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोपवली. त्यानंतर आता प्रियंका गांधी यांच्या टीममध्ये आता कोल्हापूरचे काँग्रेस कार्यकर्ते बाजीराव खाडे यांचा समावेश करण्यात आला आहे.

कोण आहेत बाजीराव खाडे?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्यात येत आहे. खाडे हे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी काँग्रेसच्या पंचायतराज समितीवर राष्ट्रीय सरचिटणीसपदी काम केलं आहे. तेलंगणाचेही ते प्रभारी होते.

गेल्या महिन्यात त्यांची काँग्रेसच्या जाहीरनामा प्रदेश समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. एमएससी अॅग्री, एमबीए शिक्षण घेतलेले खाडे यांना शासनाने कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कारानेही गौरवले आहे. यशवंत बँकेचे संचालक आणि कुंभी कासारी परिसरातील शेतकरी, दूध उत्पादक यांच्या न्यायासाठी लढणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत खाडे हे प्रियांका गांधी यांच्या टीममध्ये असणार आहेत. या टीममध्ये जुबेर खान आणि कुमार आशिष यांचाही समावेश असणार आहे. त्यांच्या सचिवपदाच्या निवडीचे पत्र काँग्रेसचे सरचिटणीस खासदार के. सी वेणुगोपाल यांनी मंगळवारी दिले आहे.

प्रियंका यांची एंट्री आणि त्यांच्यासमोरील आव्हान:

लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रियांका यांना सक्रिय राजकारणात उतरवून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मास्टर स्ट्रोक खेळला. पण आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढण्यासाठी प्रियांकांचा किती उपयोग होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रियांका गांधी यांनी राजकारणात यावे ही मागणी 2014च्या लोकसभा निवडणुकीपासून केली जात होती. आता प्रियांका यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध लढताना त्यांच्या समोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना त्या कशा सामोऱ्या जातात त्यावर काँग्रेसचे यश ठरणार आहे.

VIDEO : राहु दे, धनंजय मुंडेंनी चहाचे दिले चक्क 2000 रुपये!

First published: February 20, 2019, 12:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading