...आणि कोकिलाबेन अंबानींना अश्रू अनावर झाले

...आणि कोकिलाबेन अंबानींना अश्रू अनावर झाले

आपल्या वडिलांचं नाव घेताना मुकेश अंबानी भावुक झाले. त्यावेळी समोर उपस्थित असलेल्या कोकिलाबेन अंबानींनाही अश्रू अनावर झाले.

  • Share this:

21 जुलै :  रिलायन्सच्या 40 व्या सर्वसाधारण सभेत बोलताना मुकेश अंबानी यांनी आपले वडील धीरुभाई अंबानी यांना आदरांजली वाहिली. आपल्या वडिलांचं नाव घेताना मुकेश अंबानी भावुक झाले. त्यावेळी समोर उपस्थित असलेल्या कोकिलाबेन अंबानींनाही अश्रू अनावर झाले. या प्रसंगामुळे तिथं भावुक वातावरण निर्माण झालं. उपस्थित सभासदांनी उभे राहून आदर व्यक्त केला.

मुकेश अंबानींनी सांगितलं की, रिलायन्सचा कारभार तीन लाख तीस हजार कोटींपेक्षा जास्त झालाय. त्यावेळी कोकिलाबेनना आपले अश्रू आवरले नाहीत. यावेळी नीता अंबानी आणि त्यांचे दोन मुलगे, एक मुलगी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2017 01:16 PM IST

ताज्या बातम्या