Home /News /national /

पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यासाठी रात्रीचीच वेळ का निवडतात? हे आहे कारण...

पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यासाठी रात्रीचीच वेळ का निवडतात? हे आहे कारण...

कोरोना काळानंतर मागील काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या परदेश दौऱ्याचे (Foreign Tour) वेळापत्रक व्यस्त आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी हे जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या देशांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर गेले होते.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 21 मे : कोरोना काळानंतर मागील काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या परदेश दौऱ्याचे (Foreign Tour) वेळापत्रक व्यस्त आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी हे जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या देशांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर गेले होते. यानंतर ते बुद्ध पौर्णिमाच्या (Buddha Purnima) निमित्ताने नेपाळच्याही दौऱ्यावर (PM Modi on Nepal Visit) गेले होते. आता पुढच्या आठवड्यात पंतप्रधान मोदी हे आणखी एका महत्त्वाच्या दौऱ्यावर जपानला जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांचे वेळापत्रक बारकाईने पाहिल्यास सर्व देशांच्या दौऱ्यांमध्ये एक पॅटर्न दिसून येतो. पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यांसाठीच्या प्रवासासाठी रात्रीची वेळ निवडतात. यामागे एक मोठे कारण आहे, ते म्हणजे पंतप्रधान मोदी हे जास्तीत जास्त आपल्या वेळेचा वापर करू इच्छितात. उपयुक्त कामासाठी दिवसाचा वेळ वाचवण्यासाठी ते परदेश दौऱ्यासाठी रात्री प्रवास करणे पसंत करतात. 22 मेला जापानच्या दौऱ्यावर जाणार पंतप्रधान मोदी - पंतप्रधान नरेंद्र यांचा आगामी परदेश दौरा हा जपानचा (PM Modi on Japan Visit) असणार आहे. 22 मेच्या रात्री ते जपानसाठी रवाना होतील. 23 मेला ते टोक्यो येथे पोहोचतील. याठिकाणी पंतप्रधान मोदी हे टॉप उद्योगतपींना भेटणार आहेत. तसेच यानंतर ते भारतीय समुदायाला संबोधित करतील. पुढच्या दिवशी 24 मेला टोक्यो येथे आयोजित क्वाड नेत्यांच्या तिसऱ्या शिखर संमेलनात पंतप्रधान मोदी सहभागी होती. या बैठकीत, क्वाड नेत्यांना इंडो-पॅसिफिकमधील घडामोडी, समकालीन जागतिक समस्यांवर विचार विनिमय करण्याची संधी मिळेल. तर यानंतर 24 मे रोजी ते रात्री भारताकडे प्रयाण करतील. फक्त तीन रात्रींमध्ये पाच देशांचा प्रवास - जर पंतप्रधान मोदी यांच्या अलीकडील काही भेटींवर नजर टाकली तर असे समजते की, पीएम मोदींनी जर्मनी आणि डेन्मार्कमध्ये फक्त एक रात्र घालवली होती. यानंतर आता त्याचप्रमाणे ते जपानच्या दौऱ्यावर फक्त एक रात्र घालवतील आणि दुसऱ्या दिवशी भारतात परततील. हेही वाचा - 21 मे 1991: जेव्हा सोनिया गांधींनी विचारले, राजीव जिवंत आहेत का? पंतप्रधान मोदींनी त्यांच्या परदेश दौऱ्यांचे असे वेळापत्रक तयार केले की त्यांनी या महिन्यात केवळ तीन रात्री घालवून एकूण पाच देशांचा प्रवास केला असेल. आपला वेळ वाचवण्यासाठी ते अधिकाधिक रात्रीचा वेळ विमानात घालवतात. पंतप्रधानांच्या जवळच्या एका सूत्रांनी सांगितले की, वेळ आणि संसाधने वाचवणे ही त्यांची सवय बनली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Japan, Narendra modi

    पुढील बातम्या