विकृत! उच्च शिक्षण घेणाऱ्या पत्नीची पतीने कापली बोटं

विकृत! उच्च शिक्षण घेणाऱ्या पत्नीची पतीने कापली बोटं

पत्नीला उच्च शिक्षणापासून रोखण्यासाठी विकृत मनोवृत्तीच्या पतीने चक्क तिचे बोटं कापल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • Share this:

ढाका, 13 मे: पत्नीला उच्च शिक्षणापासून रोखण्यासाठी विकृत मनोवृत्तीच्या पतीने चक्क तिचे बोटं कापल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रफीकुल इस्लाम याला अटक करण्यात आली आहे. पत्नीने रफीकुलच्या परवानगीशिवाय पदवीचे शिक्षण सुरु केले होते. पण पत्नीच्या शिक्षणला विरोध करणाऱ्या रफीकुलने चक्क बोट कापली.

बांगलादेशमधील ढाका शहरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. माझ्या पतीने सांगितले की तुला मी सरप्राईझ देणार आहे. त्याने माझ्या डोळ्याला पट्टी बांधली आणि तोडवर टेप लावली. त्यानंतर त्याने हात पकडत माझी सर्व बोटं कापली, असे हवा अख्तर हीने सांगितले. या क्रूर कृत्यानंतर रफीकुलने तिची बोटं कचऱ्याच्या डब्यात फेकली. जेणेकरुन डॉक्टरांना ती जोडता येणार नाहीत.

रफीकुल हा सौदी अरबमध्ये काम करतो. त्याने पत्नी हवा अख्तरला शिक्षण चालू ठेवल्यास त्याच्या परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. त्यानंतर देखील तिने शिक्षण सुरुच ठेवले होते. हवा शिक्षण घेत असल्याचे समजल्यानंतर तो बांगलादेशात परत आला आणि त्याने हे कृत्य केले. केवळ आठवी पास असलेल्या रफीकुल याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने गुन्हा देखील कबूल केला आहे. मानवाधिकार संघटनेनी त्याला जन्मठेप देण्याची मागणी केली आहे.

शिक्षणाची जिद्द सोडली नाही

पतीने उजव्या हाताची बोटं कापल्यानंतर आता हवा अक्तर डाव्या हाताने लिहण्याचा प्रयत्न करत आहे. या घटनेनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ती थेट माहेरी आली. आता तिला पुढील शिक्षण पूर्ण करायचे आहे. बांगलादेशात शिक्षण घेणाऱ्या महिलांवर हल्ला करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी जूनमध्ये एकाने ढाका विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापकाच्या पत्नीचे डोळे काढले होते. संबंधित महिलेला कॅनडा विद्यापीठात शिक्षण मिळू नये म्हणून अशा प्रकारचा हल्ला करण्यात आला होता.

मुलीसोबत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला कारने उडवलं, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

First published: May 13, 2019, 11:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading