मराठी बातम्या /बातम्या /देश /

सावधान! ही स्मार्टफोन कंपनी तुमची माहिती चोरून पाठवते चीनमध्ये

सावधान! ही स्मार्टफोन कंपनी तुमची माहिती चोरून पाठवते चीनमध्ये

या कंपन्यांनी मात्र हे दावे फेटाळले आहेत. कंपनी वापरकर्त्याच्या डेटावर नजर ठेवते मात्र तो थर्ड पार्टीला पाठवत नाही असं असं या कंपन्यांचं म्हणणं आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
मुंबई 03 मे : कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर चीनविषयी जगभर कमालीचा असंतोष निर्माण झालाय. चीनी माल, चीनी कंपन्यांविषयी लोकांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण झालीय. या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. Xiaomi ही स्मार्टफोनची मोठी कंपनी आपल्या फोन वापरकर्त्यांचा डेटा चोरून चीनला पाठवत असल्याचं समोर आलं आहे. फोर्ब्‍स (Forbes)ने केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. याआधीही अनेकदा स्मार्ट फोन वापरताना सावध राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या इनकॉग्‍नीटो मोड (Incognito Mode)वर फोन असतानाही तुमची माहिती ही चीनमधल्या सर्व्हरमध्ये जात असल्याचं आढळून आलं आहे. या कंपन्यांनी मात्र हे दावे फेटाळले आहेत. कंपनी वापरकर्त्याच्या डेटावर नजर ठेवते मात्र तो थर्ड पार्टीला पाठवत नाही असं असं या कंपन्यांचं म्हणणं आहे. फोर्ब्स च्या अभ्यासानुसार युजर्स डिफॉल्ट मोडवर जरी इंटरनेटचा वापर करत असेल तरीही त्याची माहिती ही सर्व्हरला चीनमध्ये पाठवली जाते असं दिसून आलं आहे. युजर्सच्या आवडी निवडी, ते काय, किती वेळी बघतात, कुठेले Apps वापरतात, कुठले व्हिडिओ बघतात, त्याचं ड्युरेशन काय आहे. एवढच नव्हे तर फोन स्वाईप किती वेळा केला जातो याचीही माहिती ठेवली जाते. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात 'या' राज्यात होणार दारुची होम डिलिव्हरी या माहितीचा वापर मुख्यकरून मार्केटिंगसाठी आणि बाजारात काय मागणी आहे किंवा काय पाहिजे आहे यासाठी केला जातो. त्याचबरोबर देशातल्या कोट्यवधी लोकांची माहिती असल्याचं त्याचा हेरगिरीसाठीही वापर होऊ शकतो अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी जाण्याचा धोका! घरबसल्या या व्यवसायातून करू शकता लाखोंची कमाई डिजिटलच्या युगात डेटाला सर्वाधिक महत्त्व आहे. डेटा म्हणजे न्यू ऑईल असंही म्हटलं जातं. त्यामुळे या स्मार्टफोन कंपन्यांच्या हेतुबद्दलच आता शंका निर्माण झाली आहे.
First published:

पुढील बातम्या