नोएडा, 29 ऑगस्ट : सुपरटेकचे ट्विन टॉवर्स (Supertech Twin Tower) पाडण्यात आले आहेत. 32 आणि 29 मजली टॉवर्सने जमिनीवर ढिगाऱ्याचे स्वरूप धारण केले आहे. सध्या ढिगाऱ्यांची तपासणी सुरू आहे. कुठेही एखादं स्फोटक जीवंत राहू नये. दोन्ही टॉवरमधून 60 ते 65 हजार टन राडारोडा बाहेर पडल्याचे बोलले जात आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, डेब्रिजची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नोएडा प्राधिकरणाकडे (Noida Authority) देण्यात आली आहे. प्राधिकरण सेक्टर-80 मधील कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन (CnD) वेस्ट प्लांटमधील ट्विन टॉवर्सच्या डेब्रिजचा वापर करणार आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की वेस्ट प्लांटमध्ये नोएडामध्ये राडारोडा संकलन केंद्र आहे जे एका फोन कॉलवर राडारोडा विनामूल्य उचलते.
कचऱ्यापासून टाईल्स निर्मिती, रस्त्यामध्ये धूळीचा वापर
तज्ज्ञांच्या मते, नोएडा प्राधिकरणाने एका खाजगी कंपनीच्या सहकार्याने सेक्टर-80 मध्ये एक सी आणि डी प्लांट उघडला आहे. येथे नोएडा शहरातील राडारोड्याचा पुनर्वापर केला जातो. भंगार वेगळे केल्यानंतर, ते इंटरलॉकिंग टाइल्स तयार करण्यासाठी वापरले जाते. ट्विन टॉवर्समधील डेब्रिजचाही येथे पुनर्वापर केला जाणार आहे. ढिगाऱ्यापासून टाइल्स तयार केल्या जातील. यानंतर, भंगारातील उरलेली डस्ट रस्ता बांधकामादरम्यान वापरली जाईल.
वाचा - ट्विन टॉवर पाडण्याच्या काही तास आधी बिल्डिंगमध्ये तरुण गाढ झोपेत; शेवटी धावाधाव.
… ट्विन टॉवरच्या राडारोड्याचा 6 महिन्यांत पुनर्वापर केला जाईल
ट्विन टॉवर्स ढिगाऱ्यात बदलले आहेत. ढिगाऱ्यांच्या प्रमाणाबाबत वेगवेगळे आकडे सांगण्यात येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुठेतरी ढिगाऱ्याचा आकडा 60 हजार टन सांगितला जात आहे, तर कुठे 65 हजार टन. किमान आकडेवारीचा विचार केला तर ट्विन टॉवरमधून 60 हजार टन राडारोडा बाहेर पडेल. ढोबळ अंदाजानुसार सुमारे 4 ते 5 हजार टन पोलाद ढिगाऱ्यातून बाहेर काढले जाईल. अशाप्रकारे 55 हजार टन डेब्रिज रिसायकलिंगसाठी सेक्टर-80 येथील सी आणि डी केंद्रात जाईल.
तज्ज्ञांच्या मते, या केंद्राची क्षमता दररोज 300 टन कचरा पुनर्वापर करण्याची आहे. यानुसार ट्विन टॉवर्समधील ढिगाऱ्यांचे पुनर्वापर करण्यासाठी किमान 6 महिने लागतील. वेळ वाढू शकतो. कारण नोएडामधून दररोज बाहेर पडणाऱ्या कचऱ्याच्या पुनर्वापराची जबाबदारीही केंद्राकडे आहे. त्यामुळे नोएडा आणि ट्विन टॉवर्सच्या भंगाराचा एकाच वेळी पुनर्वापर होईल, असे प्रयत्न सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttar pradesh