Home /News /national /

महात्मा गांधी स्मृतिदिन 2021 : बापूंचा आहार कसा होता? जाणून घ्या त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांविषयी

महात्मा गांधी स्मृतिदिन 2021 : बापूंचा आहार कसा होता? जाणून घ्या त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांविषयी

, महात्मा गांधी स्मृतीदिवस,

, महात्मा गांधी स्मृतीदिवस,

बापूंनी तर त्या काळातही त्यांच्या आहारावर खूप लक्ष दिलं होतं. त्या काळात ते आपला आहार कसा ठेवायचे आणि काय खात होते याची उत्सुकता अनेकांना आहे.

    नवी दिल्ली, 30 जानेवारी: अहिंसेच्या मार्गानं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधीजींचा सिंहाचा वाटा आहे. यंदा त्यांचा स्मृतीदिन कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे साध्या पद्धतीनं साजरा केला जात आहे. त्यांनी जगाला जी प्रेरणा आणि संदेश दिले ते कायमच आपल्या आयुष्यात अवलंबण्यासारखे आहेत. कोरोनाच्या काळात आता आपण आहाराकडे खूप लक्ष देतो. पण बापूंनी तर त्या काळातही त्यांच्या आहारावर खूप लक्ष दिलं होतं. त्या काळात ते आपला आहार कसा ठेवायचे आणि काय खात होते याची उत्सुकता अनेकांना आहे. मीठाच्या सत्याग्रहापासून अनेक चळवळी त्यांनी केल्या. यासाठी त्यांना अनेक ठिकाणी दौरे आणि चळवळीसाठी फिरावं लागत होतं. अहिंसेच्या मार्गानं चालणाऱ्या आणि जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा आहारही त्यांच्या राहणीमानानुसार आणि पेहरावासारखाच अगदी साधा होता. त्यांना कोणत्या गोष्टी खायला आवडत होत्या जाणून घ्या. पेढा गुजरातमध्ये माव्याचा पेढा त्या काळी खूप प्रसिद्ध होता. महात्मा गांधीजींना हा पेढा खूप आवडत होता. गोड खाद्यपदार्थांमध्ये या पेढ्याला पहिली पसंती होती. दुधी भोपळा दुधी भोपळ्यात खूप पोषक तत्व असतात असं म्हटलं जातं. बापूंना मात्र दुधी भोपळा उकडून खायला आवडायचा. बीट आणि वांग बापूंचा कायमच सात्विक आहारावर भर होता. तामसी आहार किंवा राग वाढवणाऱ्या अन्नपदार्थांपासून ते कायमच दूर राहिले. त्यांच्या आहारात कायम हिरव्या भाज्यांचं प्रमाण जास्त होतं. उकडलेल्या भाज्यांमध्ये मीठ न घालता ते खायचे. वांग आणि बीट उकडून ते नेहमी खायचे. डाळ आणि भात साधं जेवण किंवा एकदम साधा आहार हे नेहमी त्यांचं तत्व होतं. डाळीतून प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट मिळतात त्यामुळे त्यांना नुसती डाळ, वरळ खायला देखील आवडत असे. दही आणि ताक महत्मा गांधीजींना दही खूप आवडत होते. ताक आणि दह्यामुळे पचन खूप चांगलं होतं असं म्हटलं जातं. याशिवाय शरीरातील दाह कमी करण्यासाठी मदत होते. त्यामुळे आवर्जून ते दही आणि ताक घेत असतं. बदामाचं दूध स्वत: साठी बदाम दूध बनविणे आणि पिणे हा महात्मा गांधींच्या रुटीनचा एक भाग होता. बदामाचा शिरा बापूंना गोड पदार्थांमध्ये बदामाचा शिरा आणि सुका मेवा खूप आवडायचा. (अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती आणि माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही.)
    Published by:news18 desk
    First published:

    Tags: Mahatma gandhi, महात्मा गांधी

    पुढील बातम्या