नवी दिल्ली, 14 जुलै: भारताचे चांद्रयान-2 या मोहिमेकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. उद्या म्हणजेच 15 जुलै रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISROच्या शक्तिशाली रॉकेट बाहुबलीच्या मदतीने चांद्रयान-2चे प्रक्षेपण केले जाणार आहे. हे प्रक्षेपण तुम्ही LIVE पाहू शकता. यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. भारताच्या या महत्त्वकांक्षी मोहिमेचे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी आतापर्यंत अनेकांनी नोंदणी केली आहे.
ISRO गेल्या काही दिवसांपासून लोकांना LIVE प्रक्षेपण दाखवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी एका खास गॅलरीची तयार करण्यात आली आहे. या गॅलरीत 10 हजार लोक बसू शकतात. जर तुम्हाला देखील चांद्रयान-2चे प्रक्षेपण पाहायचे असेल तर तुम्ही https://liveregister.isro.gov.in/LRC/ या लिंकवर जाऊन नोंदणी करू शकता. 15 जुलै रोजी पहाटे 2.15 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-3च्या मदतीने चांद्रयान-2 अवकाशात झेपवणार आहे.
अंतराळातील भारताची ताकद
अंतराळ क्षेत्रात भारताने गेल्या काही दिवसात मोठी भरारी मारली आहे. मार्च महिन्यात भारताने अंतराळातील लाईव्ह उपग्रह पाडला होता. मिशन शक्तीच्या या यशानंतर भारत जगभरातील मोजक्या देशांच्या पंक्तीत विराजमान झाला होता. अंतराळात कार्यरत असलेला उपग्रह पाडण्याची क्षमता केवळ अमेरिका, रशिया आणि चीन यांच्याकडेच होती.
चांद्रयान-2ची वैशिष्ट्ये
1) चांद्रयान-2चे वजन 3.8 टन इतके आहे. आठ हत्तींच्या वजनाच्या इतके आहे हे वजन
2) यात 13 भारतीय पेलोड असतील त्यातील 8 ऑर्बिटर, 3 लँडर आणि 2 रोव्हर असतील. याशिवाय NASAचे एक पॅसिव्ह एक्सपेरिमेंट देखील असेल.
3) चांद्रयान-2 चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणार आहे. आजपर्यंत चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणारी मोहिम झालेली नाही.
4) भविष्यातील अनेक मोहिमांसाठी चांद्रयान-2 एक उदाहरण ठरणार आहे.
5) या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिम ध्रुवावर पोहोचणार आहे. या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आजपर्यंत कोणत्याही देशाने केलेला नाही.
6) चांद्रयान-2 एकूण 12 भारतीय उपकरणे घेऊन जाणार आहे.
चांद्रयान- 1 यशस्वी
चांद्रयान -1 या मोहिमेनंतर 10 वर्षांनी इस्रोची ही चांद्रयान मोहीम होते आहे. 2009 मध्ये पाठवलेल्या चांद्रयानात चंद्राच्या कक्षेत फिरणारं ऑरबिटर होतं. पण चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून संशोधन करणारं रोव्हर त्यावेळी नव्हतं. यावेळी मात्र या यानाचं रोव्हर थेट चंद्रावर उतरणार आहे.
चांद्रयान - 1 या यानाने चंद्रावरचे पाण्याचे अंश शोधून काढले होते. त्याआधी 2008 मध्ये भारताने आपला उपग्रह यशस्वीपणे चंद्रावर पाठवला होता. या उपग्रहामार्फत चंद्राबद्दल महत्त्वाचं संशोधन करण्यात यश मिळालं होतं. आता चांद्रयान - 2 मोहिमेमधलं रोव्हर जेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल तेव्हा चंद्राची आणखी रहस्यं उलगडता येतील.
VIDEO: मलायका अरोराच्या फिटनेसचं रहस्य काय?