हॉटेल-रेस्टॉरंट सुरु करण्याची संधी, 'ही' बँक देतेय 10 कोटी पर्यंतचं कर्ज

हॉटेल-रेस्टॉरंट सुरु करण्याची संधी, 'ही' बँक देतेय 10 कोटी पर्यंतचं कर्ज

स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचं तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकतं.

  • Share this:

मुंबई, 7 मार्च:आजघडीला प्रत्येकजण स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा स्वप्न बघत असतो. मात्र प्रत्येकाला ते शक्य होत नाही. तुम्ही सुद्धा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर तुमच्या एक चांगली संधी आहे. जर तुम्हाला हॉटेल किंवा रेस्टॉरंट सुरु करायचं असेल तर सिंडिकेट बँक यासाठी विशेष कर्जसुविधा देत आहे. त्यामुळे तुमचं स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचं तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकतं.

'या' योजनेद्वारे मिळणार कर्ज

सिंडिकेट बँकेच्या सिंड हॉटेल या योजने अंतर्गत तुम्हाला 10 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. यावर 11.25 टक्के ते 12.75 पर्यंत व्याज द्यावं लागणार आहे. या कर्जाचा परतफेडीचा कालावधी 7 वर्षांचा असून यासाठी असलेल्या अटीही सर्वसाधारण आहेत.

काय आहे उद्देश?

MSME व्यवसायला चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यातून रेस्टॉरंट, लाँज, फास्ट फूड सेंटर, ढाबा, बेकरी, हायवे इन, पिझ्झा सेंटर(फ्रेंचाइजी), मेस, कँटीन, कॅटेरींग सेवा हे व्यवसाय सुरु करता येतील. याशिवाय सुरु असलेल्या हॉटेल व्यवसायांमध्ये सुधारणा करण्यासाठीही या योजनेतून कर्जसुविधा मिळाणार आहे.

कोणाला मिळणार कर्ज

या योजने अंतर्गत हॉटेल व्यवसाय क्षेत्रातील असे लहान आणि मध्यम व्यवसायिक हे कर्ज घेऊ शकतात, ज्यांनी या व्यवसायात 5 कोटीपेक्षा कमी पैशांची गुंतवणूक केली आहे. कोणतीही व्यक्ती, भागीदार, लिमिटेड कंपनी किंवा ट्रस्ट किंवा सोसायटी या योजनेतून कर्जचा लाभ घेऊ शकते. मात्र त्या व्यक्तिकडे महापालिका किंवा स्थानिक संस्थेचा वैध परवाना असणे आवश्यक आहे.

किती मिळणार कर्ज

या योजनेअंतर्गत टर्म लोन आणि ओव्हरड्राफ्ट स्वरुपात कर्ज दिले जाणार आहे. तसेच या योजनेतून लहान व्यवसायिकांनाही 10 कोटी पर्यंत कर्ज मिळण्याची सोय आहे.

मार्जिन आणि व्याजदर

>> या कर्जामध्ये 1कोटी पर्यंतच्या रक्कमेवर 15% आणि 1 कोटीहून जास्त कर्जावर 20% मार्जिन असेल.

>>या योजनेत 10 लाख रुपयांच्या कर्जावर व्याजदर बेस रेटपेक्षा 1% जास्त असेल. सध्याचा बेस रेट 10.25% एवढा आहे. त्यानुसार या कर्जावर तुम्हाला 11.25% व्याज लागणार आहे.

>>10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर 12.25% व्याज तर 1 ते 10 कोटीपर्यंतच्या कर्जावर 12.75% व्याज आकारण्यात येईल. शिवाय 36 महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी कर्जावर 0.25% टेनर प्रीमियम लावण्यात येईल.

काय ठेवावे लागणार तारण

>>एक कोटी रुपये पर्यंतची सर्व कर्ज ही सीजीटीएमएसई (क्रेडीट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल इंटरप्रायझेस)योजनेअंतर्गत येतात. ज्यामुळे या कर्जासाठी काहीतरी तारण ठेवणे गरजेचे आहे.

>>एक कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेच्या कर्जासाठी व्यवसायासंबंधीत इमारत किंवा जमिन तारण ठेवावी लागणार आहे.

>>कर्जासाठी तारण ठेवलेली संपत्ती कोणत्याही स्वरुपात सीजीटीएमएसई योजने अंतर्गत येणार नाही.

First published: March 7, 2019, 10:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading