लोकसभेसाठी झाले रेकॉर्ड ब्रेक मतदान, कोणाला होणार फायदा?

लोकसभेच्या 542 जागांसाठी सात टप्प्यात झालेल्या मतदान प्रक्रियेत भारतीय मतदारांनी यंदा सर्व विक्रम मागे टाकले आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 07:38 AM IST

लोकसभेसाठी झाले रेकॉर्ड ब्रेक मतदान, कोणाला होणार फायदा?

नवी दिल्ली, 21 मे: लोकसभा निवडणुकीत भारतीय मतदारांनी ऐतिहासिक अशी कामगिरी केली आहे. लोकसभेच्या 542 जागांसाठी सात टप्प्यात झालेल्या मतदान प्रक्रियेत भारतीय मतदारांनी यंदा सर्व विक्रम मागे टाकले आहेत. यंदा लोकसभेसाठी 67.11 टक्के मतदान झाले आहे. जवळ जवळ 91 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 2014च्या निवडणुकीत हेच प्रमाण 66.40 टक्के इतके होते. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप अंतिम मतदानाची टक्केवारी जाहीर केलेली नाही. असे असले तरी मतदानाच्या टक्केवारीने यंदा विक्रम केला आहे.

सोमवारी सकाळपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या मतदानाची टक्केवारी 67.11 टक्के इतकी आहे. लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांसाठी यंदा मतदान झाले आहे. तामिनाडूतील वेल्लूर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पैसे सापडल्याने येथील निवडणूक रद्द करण्यात आली आहे. वेल्लूरमधील तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. 2014मध्ये 83.40 कोटी मतदारांनी निवडणू्क प्रक्रियेत सहभाग घेतला होता.

प्रत्येक टप्प्यात मतदान कमी होत गेले

यंदा मतदानाची एकूण टक्केवारी वाढली असली तरी वोटर टर्नआउट अॅपनुसार प्रत्येक टप्प्यानंतर मतदानाची टक्केवारी घटत गेली. आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या टप्प्यात 69.61, दुसऱ्या टप्प्यात 69.44, तिसऱ्या टप्प्यात 68.40, चौथ्या टप्प्यात 65.50 टक्के मतदान झाले. पाचव्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी आणखी घटली आणि ती 64.16 टक्क्यांवर गेली. सहाव्या आणि सातव्या टप्प्यात मतदानाच काहीशी वाढ झाली. सहाव्या टप्प्यात 64.40 तर सातव्या टप्प्यात 65.15 टक्के मतदानाची नोंद झाली.

पहिल्या सहा टप्प्यांचा विचार केल्यास 2014च्या तुलनेत यंदा 1.21 टक्क्यांनी अधिक मतदान झाले आहे.

Loading...

राज्यांचा विचार करता चंदीगड आणि पंजामध्ये यंदा कमी मतदान नोंदवले गेले आहे. तर मध्य प्रदेशमध्ये यंदा 2014च्या तुलनेत 5.92 टक्के अधिक मतदान झाले आहे. अशीच वाढ हिमाचलमध्ये देखील दिसून आली आहे. हिमचालमध्ये यंदा 5.1 टक्के अधिक मतदान झाले आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदीगडमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 10.27 टक्के कमी मतदान झाले आहे. तर पंजाबमध्ये देखील 5.46 टक्के कमी मतदान नोंदवले गेले आहे. याशिवाय देशातील अन्य राज्यात 2014च्या तुलनेत सरासरी 2.5 टक्के अधिक मतदानाची नोंद झाली आहे.

16.49 लाख लोकांनी केले पोस्टाने मतदान

17 मे 2019 पर्यंत 16.49 लाख मतदारांनी पोस्टाद्वारे मतदान केले. पोस्टाने मतदान करणाऱ्यां मतदारांची संख्या 18 लाख इतकी आहे. यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या 0.4 टक्क्यांनी कमी आहे.


SPECIAL REPORT : 'विवेक' का सुटला, सलमान पुन्हा करेल का माफ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 07:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...