Corona ची लस फॅक्ट्रीमधून सीरिंजपर्यंत कशी पोहोचणार?

Corona ची लस फॅक्ट्रीमधून सीरिंजपर्यंत कशी पोहोचणार?

कोरोनाची लस आपल्यापर्यंत किती काळात (Corona Vaccine) पोहोचणार आहे आणि कशी पोहोचणार आहे, हे अद्याप आपल्याला माहिती नाही, पण लस कुठे तयार केली जाईल (Vaccine Production) हे आपल्याला माहीत आहे.

  • Share this:

मुंबई, 3 डिसेंबर : कोरोनाची लस आपल्यापर्यंत किती काळात (Corona Vaccine) पोहोचणार आहे आणि कशी पोहोचणार आहे, हे अद्याप आपल्याला माहिती नाही, पण लस कुठे तयार केली जाईल (Vaccine Production) हे आपल्याला माहीत आहे. तिथून ही लस कोणत्या मार्गावर जाईल? येथून पोहोचल्यानंतर लसींना साठवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे ही लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं हे एक आव्हानच आहे. कोरोना विषाणू ची लस सुरक्षितपणे कशी घेतली जाऊ शकते (Vaccine Transport) हे जाणून घेऊया.

केवळ covid-19 नाही पण यापूर्वी लसींची वाहतूक करणे हे एक मोठे आव्हान होते. कारण जास्त उष्णता, थंडी किंवा प्रकाशामुळे लसीचा प्रभाव संपू शकतो. भारत हा एक मोठा देश आहे आणि इथलं हवामान उष्ण आहे, हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच लस प्रत्येक कोपर्‍यापर्यंत पोहोचवण्याचे, हे आव्हान खूपच महत्त्वाचे ठरणार आहे. भारतासारख्या कोणत्याही देशात किंवा त्या क्षेत्रापेक्षा मोठ्या क्षेत्रात लस पोचवणे हे एक आव्हानच आहे.

भारतातील आव्हान काय आहे ?

जागतिक लसीकरण कार्यक्रमांसाठी भारतात कोल्डस्टोरेजच्या नेटवर्कमध्ये अशी 28,000 केंद्र आहेत, जिथे लसीचे कोल्डस्टोरेज (Cold storage) करणे शक्य आहे. पण सध्या कोणत्याही लस उत्पादक कंपनीने 25 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात लस वाहतूक करण्याची क्षमता निर्माण केलेली नाही. या अडचणीला सामोरे जाण्याचा एक मार्ग म्हणजे, अशा लसी तयार करणे ज्यात अत्यंत थंड तापमानात वाहतूक करण्याची आवश्यकता नाही.

माधम्यांमध्ये आलेल्या वृत्तानुसार भारतात अशा काही लसी विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, ज्यांना जास्त तापमानात ठेवल्यामुळे नुकसान होणार नाही. जर शक्य असेल तर भारतात अनुकूल हवामान परिस्थिती निर्माण करण्याची गरज नाही. दुसरीकडे covid-19 विरुद्ध तयार होण्याऱ्या लसीचे योग्य असे निकाल आतापासूनच समोर येत आहे. तेव्हापासून भारत (Indian Government) सरकारकडे कोल्डस्टोरेज ची व्यवस्था करण्यास सुरुवात झाली आहे. आता नागरिकांपर्यंत ही लस कशी पोहोचेल हे जाणून घेऊया.

लसीचं दळणवळण कसे केले जाणार?

रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणाऱ्या लसीसाठी एक संपूर्ण कोल्डस्टोरेजची व्यवस्था केली जाईल, जेणेकरून ती फॅक्टरी मधून आपल्यापर्यंत जाताना योग्यरीत्या जाईल. ही लस सिरींजमध्ये पुरवली जाण्याची शक्यता आहे. लस कारखान्यातून प्रथम ट्रक मधील रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्या जातील. त्यानंतर हे ट्रक विमानतळावर येऊन नंतर बर्फाने भरलेला थर्माकोलच्या बॉक्समध्ये लसींचा बॉक्स घेऊन ते विमान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल. मग इतर विमानतळावर उतरून त्याचप्रकारे ट्रक कोल्डस्टोरेज सुविधा असलेल्या सरकारी मेडिकल स्टोअरपर्यंत या लसी घेऊन जाईल.

मुंबई(Mumbai), कोलकाता(Kolkatta), आणि चेन्नई (Chennai) अशा ठिकाणी लस प्रथमतः पोहोचतील येथून लस राज्यांच्या वेगवेगळ्या स्टोअरमध्ये आणि त्यानंतर जिल्ह्यातील दुकानांमध्ये पोहोचवल्या जातील. तसेच ही लस जिल्हा मुख्यालयातून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामुदायिक आरोग्य केंद्रावर पोहोचवली जाऊन, मग सामान्य घरातील फ्रिजमध्ये किंवा लहान केंद्रांमध्ये डीप फ्रिजमध्ये ठेवली जाणार आहे. या संपूर्ण साखळीत लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे ती म्हणजे कोल्ड स्टोरेजमध्ये कुठलाही प्रकारचा अडथळा येऊन चालणार नाही. कारण लस योग्य तापमान न मिळाल्यास तिचा परिणाम कमी होऊ शकतो.

कोणत्या लसीसाठी किती तापमान लागणार?

फायझर बायोटेकच्या लसीला 60 ते 90 डिग्री सेल्सिअस तापमानात साठवणे आवश्यक आहे. परंतु भारतात या स्टोरेज ची सुविधा नाही. भारत काय तर इतर बहुतेक देशांमध्ये ही सुविधा नाही.

दुसरीकडे मॉडर्नाने तयार केलेली लस 20 डिग्री तापमानात साठवणे आवश्यक आहे. तसेच ही लस 2 ते 8 अंश तापमानात दोन महिने ठेवली जाऊ शकते. जे सामान्य रेफ्रिजरेटरमध्ये राहणे शक्य आहे. म्हणजेच ही लस भारत आणि बरेच देशांसाठी उपयुक्त आहे. याआधी पोलिओ लस भारतात 20 डिग्री तापमानात ठेवली जाता होती. त्याच बरोबर ॲस्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्डची लस दोन ते आठ अंश तापमानात ठेवली जाऊ शकते. पण भारतात त्याची सुविधा झाल्यानंतर ही लस सुरक्षितपणे ठेवता येईल.

Published by: Shreyas
First published: December 3, 2020, 9:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या