Home /News /national /

एका घरात राहून आणि एका ताटात जेवून लहानाचे मोठे झाले; वाचा पंतप्रधानांचा बालपणीचा मित्र अब्बासबद्दल

एका घरात राहून आणि एका ताटात जेवून लहानाचे मोठे झाले; वाचा पंतप्रधानांचा बालपणीचा मित्र अब्बासबद्दल

सोमाभाई यांनी सांगितलं की, अब्बासच्या वडिलांच्या निधनानंतर ते शिक्षणापासून दूर जात होते. आमच्या वडिलांना हे कळताच त्यांनी अब्बासला घरी आणून आमच्याकडे ठेवलं आणि त्यांचं पुढील शिक्षण पूर्ण केलं.

    नवी दिल्ली 20 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालपणीचे मित्र (Childhood friend of PM Narendra Modi) अब्बास भाई यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. आता पीएम मोदींचे मोठे बंधू सोमाभाई मोदी अब्बास यांच्याबद्दल मोकळेपणाने बोलले आणि त्यांच्याबद्दल माहिती दिली. सोमाभाई यांनी सांगितलं की, अब्बासच्या वडिलांच्या निधनानंतर ते शिक्षणापासून दूर जात होते. आमच्या वडिलांना हे कळताच त्यांनी अब्बासला घरी आणून आमच्याकडे ठेवलं आणि त्यांचं पुढील शिक्षण पूर्ण केलं. पुढे अब्बास यांना सरकारी नोकरी लागली. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे. आई हीराबेन मोदी यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी ब्लॉग लिहून अब्बास यांचा उल्लेख केला होता. लहानपणी एकप्रकारे अब्बास यांनी आमच्या घरी राहूनच शिक्षण घेतलं, असं मोदी म्हणाले होते. आम्हा सर्व मुलांप्रमाणे आई अब्बासचीही खूप काळजी घ्यायची. ईदच्या दिवशी आई अब्बाससाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवत असे, असं मोदींनी म्हटलं होतं. PM Narendra Modi Blog : माझ्यात जे चांगले आहे ते... आईच्या वाढदिवशी मोदींनी लिहिली गौरवगाथा सोमाभाई मोदी यांनी सांगितलं की, अब्बास हे वडनगरजवळील रसूलपूर गावचे रहिवासी आहेत. हे मुस्लिम गाव आहे. अब्बास माझा भाऊ पंकजसोबत अभ्यास करायचे. त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. अशा स्थितीत त्यांच्यासमोर शिक्षण सोडण्याची वेळ आली. जेव्हा माझ्या वडिलांना हे कळलं तेव्हा ते म्हणाले की बेटा, अभ्यास सोडू नकोस. मी तुला माझ्या घरी ठेवेन आणि पुढे शिकवेन. अब्बास माझ्या घरी आला. आम्ही सर्व एकत्र राहिलो. तो आमच्यासोबतच रात्रीचं जेवणंही करत असे. माझी आई त्याच्यासाठीही जेवण बनवायची. पुढे अब्बासला सरकारी नोकरी मिळाली. आता अब्बास वर्षभरापूर्वी निवृत्त झाले. सोमाभाई सांगतात, की आपल्यात माणुसकीचे गुण आहेत. आम्हाला भांडणांचा तिरस्कार आहे. नरेंद्रभाईही या गोष्टींपासून लांब राहातात. सगळ्यांनी मिळून आनंदाने राहावं, असाच त्यांचा विचार आहे. अब्बास सध्या आपल्या धाकट्या मुलासोबत ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे राहतात. त्यांला दोन मुले आहेत. धाकटा मुलगा ऑस्ट्रेलिया आणि मोठा मुलगा गुजरातच्या कासिम्पा गावात राहतो. अब्बास हे सरकारी क्लास 2 कर्मचारी होते. ते अन्न व पुरवठा विभागात होते. काही महिन्यांपूर्वी ते निवृत्त झाले. पंतप्रधानांच्या आईचं शंभरीत पदार्पण, मोदींनी पाय धुवत घेतला आशीर्वाद, पाहा PHOTOS पीएम मोदींनी ब्लॉगमध्ये अब्बास यांचा उल्लेख केला आणि लिहिलं होतं की, 'दुसऱ्यांना आनंदी पाहून आई नेहमी आनंदी असते. घरात जागा कमी असेल, पण तिचं मन खूप मोठं आहे. उदाहरणार्थ, पंतप्रधानांनी सांगितलं की आमच्या घरापासून थोडं दूर एक गाव होतं, जिथे माझ्या वडिलांचे खूप जवळचे मुस्लिम मित्र राहत होते. त्यांचा मुलगा अब्बास होता. अब्बासच्या वडिलांच्या अकाली निधनानंतर आमच्या वडिलांनी असहाय्य अब्बासला घरी आणलं होतं. एकप्रकारे अब्बास आमच्या घरी राहूनच अभ्यास करत असे. आम्हा सर्व मुलांप्रमाणे आईही अब्बासची खूप काळजी घ्यायची. ईदच्या दिवशी आई अब्बाससाठी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवत असे. माझ्या आईने बनवलेले पदार्थही त्याला खूप आवडायचे.'
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Narendra modi, Pm modi

    पुढील बातम्या