Article 370: विरोधकांची बोलती बंद करणारे 17 मिनिटांचे भाषण; होत आहे तुफान व्हायरल!

नामग्याल यांचे लोकसभेतील भाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 09:36 PM IST

Article 370: विरोधकांची बोलती बंद करणारे 17 मिनिटांचे भाषण; होत आहे तुफान व्हायरल!

नवी दिल्ली, 07 ऑगस्ट: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir)साठीचे कलम 370 (Article 370) रद्द केल्यानंतर अनेक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाचे व्हिडिओ व्हायरल झाले. शहा यांचे राज्यसभा आणि लोकसभेतील भाषणाच्या अनेक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोकसभेत कलम 370 संदर्भात चर्चा करताना अनेक खासदारांनी भाषण केले. पण असे एक भाषण ज्यांने विरोधकांची बोलतीच बंद झाली. काश्मीरमधील 370 रदद् करतानाच अमित शहा यांनी लडाख केंद्र शासित प्रदेश करत असल्याचे जाहीर केले. यावर विरोधकांनी भरपूर टीका केली. त्याला अमित शहांनी सडेतोड उत्तर दिले. पण 370 रद्द करण्यावर आणि केंद्र शासित प्रदेश करण्यावर आक्षेप घेणाऱ्यांना लडाखचे तरुण खासदार जामयांग सेरिंग नामग्याल (jamyang tsering namgyal)असे काही उत्तर दिले की विरोधकांना गप्प बसावे लागले. लोकसभेतील 17 मिनिटाच्या या भाषणामुळे नामग्याल देशभरात लोकप्रिय झाले आहेत.

नामग्याल यांचे लोकसभेतील भाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 370 रद्द करण्यासंदर्भात नामग्याल यांनी जे उत्तर दिले तसे उत्तर खुद्द अमित शहा यांना देखील देता आले नाही. 33 वर्षीय नामग्याल हे लोकसभेतील सर्वात तरुण खासदार आहेत. भौगोलिक दृष्ट्या सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या लडाखचे ते प्रतिनिधत्व करतात. अवघ्या 33 वर्षीय त्यांनी जे भाषण केले त्यामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. खुद्द लोकसभेत राजनाथ सिंह, अमित शहा यांच्यासह सर्व नेत्यांनी नामग्याल यांचे भाषणाला दाद दिली.

कोण आहेत नामग्याल

नामग्याल यांचा जन्म 4 ऑगस्ट 1985 रोजी लडाख येथील माथो गावात झाला. नामग्याल यांचे कुटुंबीय बुद्धिज्म मानतात. नामग्याल यांनी जम्मू विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. जम्मू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आल्यानंतर ते प्रथम चर्चेत आले होते. त्यानंतर ते लडाख विद्यार्थी संघटनेचे 2011-12 या काळात अध्यक्ष होते. विद्यार्थी संघटनेनंतर ते राजकारणात आले. याआधी लडाखचे खासदार असलेल्या थुपस्तान चेवांग याचे नामग्याल हे सचिव म्हणू्न काम करत होते. त्यानंतर त्यांनी लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काऊसिलची निवडणूक लढली आणि ते विजयी देखील झाले. 2018-19 याकाळात ते काऊंसिलचे अध्यक्ष देखील होते. त्याच बरोबर ते भाजपच्या विविध पदांवर काम करत होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांनी संधी दिली आणि विक्रमी मतांनी नामग्याल यांनी विजय मिळवला.

Loading...

VIDEO : कोल्हा'पुरा'त अडकल्या पाठकबाई, सांगितला थरारक अनुभव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 09:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...