पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त आहे या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा पगार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त आहे या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा पगार!

काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा पगार हा पंतप्रधानांच्या पगारापेक्षाही तब्बल अडीच पट जास्त आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 23 सप्टेंबर : पंतप्रधान हे देशातलं सगळ्यात मोठं कार्यकारी पद. पंतप्रधानांचं (Prime Minister) वेतन नेमकं किती आहे अशी उत्सुकता कायम सगळ्यांनाच असतं. पंतप्रधानांचं वेतन सगळ्यात जास्त असावं असंही सगळ्यांना वाटतं असतं. मात्र पंतप्रधानांनपेक्षाही काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना (Chief Minister) जास्त पगार आहे. देशात राष्ट्रपती (President) तर राज्यात राज्यपाल हे सर्वोच्च पद आहे. त्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त पगार (Salary) असावा असा सगळ्यांचा अंदाज  असतो. मात्र परिस्थिती मात्र वेगळी आहे. काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा पगार हा राज्यपालांपेक्षा (Governor) जास्त तर आहेच मात्र तो पंतप्रधानांच्या पगारापेक्षाही तब्बल अडीच पट जास्त असल्याची वस्तुस्थिती असल्याची माहिती समोर आलीय.

मनसेचं ठरलं... मराठवाड्यातील 48 जागांपैकी एवढ्या जागावर लढणार

पंतप्रधानांच्या पगारात अनेकदा फेरबदल करण्यात आले आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पगार हा महिन्याला 1 लाख 60 हजार एवढा आहे. मात्र काही राज्यांच्या मुख्यंत्र्यांचा पगार हा महिन्याला 4 लाखांपर्यंत आणि त्यापेक्षाही जास्त आहे. हा पगार ठरविण्याची विशिष्ट पद्धत असून त्या नियमांनुसार हा पगार निश्चित केला जातो आणि त्यात बदलही केले जातात.

सर्व राज्यांमध्ये तेलंगनाच्या मुख्यमंत्र्यांचा पगार हा सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वात जास्त आहे. तेलंगनाच्या मुख्यमंत्र्यांचा पगार हा 4 लाख 10 हजार एवढा आहे. त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या पगार 3 लाख 90 हजार एवढा आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पगार 3 लाख 21 हजार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा पगार 3 लाखांपेक्षा जास्त आहे. पंतप्रधानांच्या पगाराच्या तुलनेत या 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा पगार हा सर्वात जास्त आहे.

CM फडणविसांविरोधात मनसे मैदानात, उमेदवार यादी जाहीर करण्याआधीच जहरी टीका

2 लाखांपेक्षा जास्त आणि 3 लाखांपेक्षा कमी पगार असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब, गोवा, बिहार, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. सर्वात कमी पगार हा त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांना फक्त 1 लाख 5 हजार एवढं वेतन मिळतं. तर ओडिसाच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांएवढं म्हणजे 1 लाख 60 हजार इतकं वेतन आहे.

कसा ठरतो मुख्यमंत्र्यांचा पगार?

मुख्यमंत्र्यांना किती वेतन असावं याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्याच्या विधानसभेला आहे. घटनेच्या कलम 164 नुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती ही राज्यपाल करत असतात. विधानसभेचे सर्व सदस्य हे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचा पगार किती असावा याचा निर्णय घेत असतात.

पूर्वोत्तर राज्यांमध्या मुख्यमंत्र्यांचं वेतन सर्वात कमी आहे. या राज्यांचं उत्पन्न आणि कमी असल्याने हे वेतन कमी असल्याचं बोललं जातं. तर मोठ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं वेतन हे जास्त आहे. काही राज्यांमध्ये राज्यपालांचं वेतन हे मुख्यमंत्र्यांच्या वेतनापेक्षाही जास्त आहे. राष्ट्रपती हे पद सर्वोच्च असल्याने त्यांचं वेतन हे 5 लाख आणि भत्ते वेगळे असं असून ते सर्वात जास्त आहे.

First published: September 23, 2019, 5:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading