कोण आहेत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे प्रमोद सावंत?

मनोहर पर्रिकरांच्या आजाराबद्दलची माहीती प्रमोद सावंत यांनी दिली होती.

  • Share this:

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाने प्रमोद सावंत यांना नवे मुख्यमंत्री केले आहे.

पर्रिकरांच्या आजाराचे निदान झाल्यानंतर सावंत यांचे नाव गोव्याच्या राजकारणात चर्चेत येत होते. फेब्रुवारीमध्ये पर्रिकरांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल केल्यानंतर सावंत यांनीच त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती.

प्रमोद सावंत उत्तर गोव्यातील सैनक्वलिम विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. एक आयुर्वेद चिकित्सक असलेल्या सावंत यांना पर्रिकरांचे निकटवर्तीय मानले जाते.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात काँग्रेसने प्रमोद सावंत यांना विधानसभेच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची नोटीस दिली होती. काँग्रेसने भाजप सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला होता.

पर्रिकरांची प्रकृती खालावल्यानंतर गेल्या तीन दिवसांमध्ये प्रमोद सावंत यांचे नाव चर्चेत होते. गोव्यात भाजपचे सहकारी पक्ष सावंत यांना समर्थन देणार नाहीत असेही म्हटले जात होते.

मनोहर पर्रिकर यांचे शनिवारी निधन झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या. शनिवारी सकाळीच काँग्रेसने गोव्याच्या राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता.

गोवा विधानसभेच्या 40 जागांपैकी 3 जागा रिकाम्या आहेत. त्याठिकाणी 23 एप्रिलला पोटनिवडणुका होणार आहेत. सध्या 37 जागांपैकी बहुमतासाठी 19 जागा आवश्यक आहेत.

आता सत्तेत असलेल्या भाजपकडे 12, महाराष्ट्र गोमंतक पक्षाकडे 3, गोवा फॉरवर्ड पक्षाकडे 3 आणि 3 अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे. तर काँग्रेसकडे 14 आमदारांचे संख्याबळ आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या सहकारी पक्षातील एका आमदाराने जरी पाठिंबा काढला तरी त्यांचे गोव्यातील सरकार धोक्यात येऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2019 08:47 AM IST

ताज्या बातम्या