दीनदयाळ उपाध्याय: ज्यांच्या मृत्यूमुळे तुटलं होतं 'काँग्रेस मुक्त भारत'चं स्वप्न!

दीनदयाळ उपाध्याय: ज्यांच्या मृत्यूमुळे तुटलं होतं 'काँग्रेस मुक्त भारत'चं स्वप्न!

असे म्हटले जाते की, समाजवादी नेते (Socialist Leader) राम मनोहर लोहिया (Ram Manohar Lohia) आणि जनसंघाचे प्रणेते दीनदयाळ उपाध्याय या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन भारतीय राजकारणात 'कांग्रेस मुक्त भारत'चं (Anti-Congress Movement) बी पेरलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: 14 ऑगस्ट 1947च्या पूर्वी जी परिस्थिती होती तसाच अखंड भारत  (United India) तयार करण्याचं स्वप्न भारताच्या फाळणीनंतर 12 एप्रिल 1964च्या एका निवेदनात मांडण्यात आलं होतं. हे संयुक्त निवेदन समाजवादी नेते (Socialist Leader) राम मनोहर लोहिया (Ram Manohar Lohia)  यांच्यासोबत जनसंघाचे प्रणेते दीनदयाळ उपाध्याय यांनी जारी केले होते. असे म्हटले जाते की, या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन भारतीय राजकारणात 'कांग्रेस मुक्त भारत'चं (Anti-Congress Movement) बी पेरलं होतं. लोहिया यांनी जे अभियान सुरु केलं होतं, त्यामध्ये काँग्रेसविरोधात सर्व पक्ष एकजूट करण्यासाठी त्यांनी उपाध्याय यांच्यासोबत हात मिळवणी केली होती.

मैत्री दोन्ही बाजूंनी होती त्यामुळे 1963मध्ये कानपूर येथे झालेल्या आरएसएसच्या (RSS) शिबिरामध्ये येण्याचं निमंत्रण नानाजी देशमुखांनी लोहिया यांना दिलं होतं. लोहिया या विचारसरणीचे नव्हते त्यामुळे ते आरएसएसच्या कार्यक्रमात का गेले असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्यावर त्यांनी उत्तर दिले होतं की, 'मी संन्याश्यांना गृहस्थ बनवण्यासाठी गेलो होतो.'  तरीही, लोहिया आणि उपाध्याय यांनी भारत-पाकिस्तान फाळणी रद्द करण्यासंबंधी जे निवेदन प्रसिद्ध केलं होतं ते काँग्रेस विरोधातील मोहिमेचा पहिला अध्याय होता. पण एका घटनेने चित्र बदलले.

मे 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लाल बहादुर शास्त्री पंतप्रधान झाले. लोहिया आणि उपाध्याय नवीन पद्धतीने विरोधाची रुपरेषा तयार करण्यामध्ये गुंतले आणि पुन्हा पाकिस्तानसोबत युद्धाची वेळ आली. 1965मध्ये युद्धबंदी करार करण्यासाठी लाल बहादुर शास्त्री ताश्कंदमध्ये गेले पण त्या ठिकाणी त्यांचा संशयास्पद परिस्थितीमध्ये मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

फक्त काँग्रेसच नाही तर देशभरामध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते. इंदिरा गांधींनी कार्यभार स्वीकारण्यापूर्वी निर्माण झालेल्या अनेक परिस्थितींमुळे लोहिया आणि उपाध्याय यांच्या काँग्रेस मुक्त भारत अभियानाची गती थोडी कमी झाली होती. तर दुसरीकडे उपाध्याय संघटना तयार करण्यामध्ये व्यग्र होते. 1967 मध्ये उपाध्याय भारतीय जनसंघाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले दीनदयाळजीच काय पण कुणालाही माहिती नव्हते की ते फक्त 3 महिनेच हे पद संभाळू शकतील.

(हे वाचा-अर्थखाते कसे चालवायचे हे अजितदादांकडून शिका, सुळेंचा अर्थमंत्र्यांना सल्ला)

जनसंघाची स्थापना करणारे श्यामाप्रसाद मुखर्जी एकदा म्हणाले होते की, 'मला दोन दीनदयाळ द्या, मी भारताचा चेहरा बदलून टाकेन.' ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी उपाध्याय आणि लोहिया यांच्यामध्ये जो करार झाला त्यामुळे काही काळ भारताचे चित्र बदलण्यास सुरुवात झाली होती. 1967 मध्ये पहिल्यांदा असे झाले की भारतातील राज्यांमध्ये बिगर काँग्रेसी सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु झाली.

निवडणुकीच्या राजकारणासाठी लोहिया आणि उपाध्याय यांच्यात युती झाली नव्हती तर काँग्रेसविरोधात एक मजबूत पर्याय तयार करण्यासाठी दोघे एकत्र आले होते. असे मानले जाते की या काँग्रेस मुक्त भारत अभियानाचा परिणाम म्हणून उत्तर प्रदेशमध्ये चौधरी चरण सिंह, बिहारमध्ये महामाया प्रसाद सिन्हा, बंगालमध्ये अजोय मुखर्जी, ओडिशामध्ये बीजू पटनायक, राजस्थानमध्ये कुंभराम आर्य आणि मध्य प्रदेशमध्ये गोविंद नारायण सिंह यांच्या सरकारमुळे काँग्रेसला मोठा मोठा धक्का बसला होता.

हे सर्वजण आधी काँग्रेसशी संबंधित होते. पण नंतर त्यांनी बिगर काँग्रेस सरकार स्थापन केले. बलराज मधोक त्यावेळी जनसंघाचे अध्यक्ष होते. 1967मध्ये जेव्हा खूप छोट्या बहुमताच्या आधारावर इंदिरा गांधींनी सरकार स्थापन केलं. तेव्हा हा काँग्रेसचा खूप वाईट काळ होता असे म्हटले जात होते. कारण त्यावेळी अमृतसर ते कोलकातापर्यंतच्या प्रवासादरम्यान एकही काँग्रेस शासित राज्य लागत नव्हतं.

1967च्या उत्तरार्धात उपाध्याय जनसंघाचे प्रमुख झाले आणि सर्वांना आशा होती की काँग्रेस मुक्त भारत या अभियानाला वेग येईल पण दोन घटनांनी या 'काँग्रेस मुक्त भारत' अभियानाला बऱ्याच काळापर्यंत शांत केले. ऑक्टोबर 1967मध्ये लोहिया यांचे निधन झाले आणि अवघ्या तीन महिन्यांनंतर फेब्रुवारी 1968 मध्ये उपाध्याय यांचे निधन झाले.

(हे वाचा-'आता तुम्हीच वडिलकीच्या नात्याने लक्ष घाला', उदयनराजेंची शरद पवारांना विनंती)

10 फेब्रुवारी 1967 रोजी उपाध्याय सियालदह एक्स्प्रेसने पाटण्याला रवाना झाले. रात्री उशिरा 2.10 वाजता जेव्हा ट्रेन मुगलसराय स्टेशनवर पोहचली तेव्हा उपाध्याय ट्रेनमध्ये नव्हते. त्यांचा मृतदेह स्टेशनपासून 10 मिनिटांच्या अंतरावर एका ट्रॅक्शन पोल 784 जवळ सापडला. त्यांच्या हातामध्ये 5 रुपयांची नोट होती आणि नंतर असे म्हटले गेले की, चोरी करण्याच्या उद्देशाने दरोडेखोरांनी उपाध्याय यांना चालत्या ट्रेनमधून ढकलून दिले.

उपाध्याय यांना शेवटी जौनपूर स्टेशनवर ट्रेन थांबली असता जिवंत पाहिलं गेलं होतं. त्यांचा हत्येचा आरोप कोणावरही सिद्ध झाला नाही. आरएसएस आणि उपाध्याय यांच्या कुटुंबासह अनेक जणांनी बऱ्याचदा या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी सीबीआय आणि न्यायालयीन तपास केला गेला. उपाध्याय यांच्या मृत्यूनंतर 53 वर्षांनी काँग्रेस मुक्त भारत अभियान पुन्हा जोर धरत असल्याचे दिसत आहे पण त्याच्या मृत्यूचे रहस्य मात्र उलघडलं नाही.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 11, 2021, 6:30 PM IST
Tags: Delhi News

ताज्या बातम्या