News18 Lokmat

गुजरातचे काँग्रेस आमदार ठेवलेल्या हॉटेलवर आयकर विभागाची धाड

गुजरातचे 42 काँग्रेस आमदार ठेवलेल्या एलिग्टन या हॉटेलवर आयकर विभागाने छापे टाकलेत. कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मालकीचं हे हॉटेल आहे. केवळ सुडाच्या भावनेतून ही कारवाई केली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2017 04:45 PM IST

गुजरातचे काँग्रेस आमदार ठेवलेल्या हॉटेलवर आयकर विभागाची धाड

बंगळुरू : गुजरातचे 42 काँग्रेस आमदार ठेवलेल्या एलिग्टन या हॉटेलवर आयकर विभागाने छापे टाकलेत. कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मालकीचं हे हॉटेल आहे. आयकर विभागाने फक्त शिवकुमार यांचं हॉटेलच नाहीतर त्यांचं दिल्लीतलं घरावरही छापे टाकलेत. गुजराजमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी 8 ऑगस्टला मतदान होतंय. या निवडणुकीत काँग्रेसच्यावतीने अहमद पटेल मैदानात आहेत. पण त्यापूर्वीच काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामे दिल्याने पक्षाने खबरदारी म्हणून आपल्या सर्व आमदारांना कर्नाटकमध्ये सुरक्षित स्थळी नेऊन ठेवलंय पण आयकर विभागाने त्या हॉटेलवरच छापे टाकलेत.

दरम्यान, ही कारवाई सुडाच्या भावनेतून केली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय.

दरम्यान, शिवकुमार यांच्या दिल्लीतल्या घरातून आयकर विभागाने 7.5 करोडची रोकड जप्त केलीय. तसंच या कारवाईचा गुजरातच्या निवडणुकीशी कसलाही संबंध नसल्याचा खुलासा आयकर विभागाने केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2017 04:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...