S M L

किशनगंगा जलविद्युत प्रकल्पात पाकिस्तानला धक्का, जागतिक बँकांचा भारताला कौल

किशनगंगा जलविद्युत प्रकल्पावर जागतिक बँकेने पाकिस्तानला धक्का देत भारताचा प्रस्ताव स्वीकारला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 5, 2018 09:46 PM IST

किशनगंगा जलविद्युत प्रकल्पात पाकिस्तानला धक्का, जागतिक बँकांचा भारताला कौल

मुंबई, ता. 05 जून : किशनगंगा जलविद्युत प्रकल्पावर जागतिक बँकेने पाकिस्तानला धक्का देत भारताचा प्रस्ताव स्वीकारला आहे. पाकिस्तानी वृतानुसार, जागतिक बँकेने किमान 2 वर्षांनंतरया प्रकल्पासाठी तटस्थ तज्ज्ञ्याची नियुक्ती व्हावी या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. तर दुसरीकडे त्याच वेळी, पाकिस्तान या प्रस्तावाला आंतरराष्ट्रीय मध्यस्थी न्यायालयाकडे नेण्याच्या प्रयत्नात होते. या प्रकल्पाअंतर्गत झेलम नदीच्या सहाय्याने किशनगंगावर धरण बांधण्याचा प्रस्तावही होता.

2003मध्ये या प्रकल्पाला सुरूवात झाली. तर नंतर या प्रकल्पाचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लावून धरला. या प्रकल्पाच्या सुरूवातीपासूनच पाकिस्तान आरोप होतं की, दोन्ही देशांमध्ये झालेल्या सिंधू नदीच्या कराराचं हे उल्लंघन आहे. या करारानुसार दोन्ही देशांच्या नद्यांचं पाणी दोन्ही देशांना वाटण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण दरम्यान हा किशनगंगा जलविद्युत प्रकल्प हा या कराराला अनुसरूनच असल्याची भारताची भूमिका आहे.

पाकिस्तानने त्यांचे वकील जनरल अश्तर औसफ अली यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ जागतिक बँकेशी बोलण्यासाठी पाठविले होते. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनुसार, जागतिक बँकेच्या निर्णयाचा पाकिस्तान स्वीकार करणार नाही, कारण याचा त्यांच्या इतर जल संबंधित विवादांवर परिणाम होईल आणि जे पाकिस्तानसाठी अधिक महत्वाचे आहे.

सिंधू नदीच्या जल कराराने भारताला ब्यास, रावी, सतलज आणि पाकिस्ताला सिंधू, चिनाब आणि झेलम नद्यांच्या पाण्यावर नियंत्रण ठेवता येते. या अंतर्गत, भारत म्हणणं आहे की किशनगंगा जलविद्युत प्रकल्पामुळे  दोन्ही देशांना मिळणार पाणी थांबवलं जाणार नाही आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाहही कमी होणार नाही. पण पाकिस्तानचा याला विरोधा होता. पण पाकिस्तानला डावलूव जागतिक बँकांनी भारताच्या प्रस्तावाला मुंजूरी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2018 08:22 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close