Kisan Tractor Rally : शेतकरी आंदोलक आणि पोलीस भिडले, व्हिडीओ आला समोर

Kisan Tractor Rally : शेतकरी आंदोलक आणि पोलीस भिडले, व्हिडीओ आला समोर

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ठिकठिकाणी अडवल्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट होत असल्याचे समोर आले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे (Kisan Tractor Rally)आयोजन केले आहे. परंतु, या रॅलीला आता हिंसक वळण मिळत आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ठिकठिकाणी अडवल्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट होत असल्याचे समोर आले आहे.

गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. आज शेतकऱ्यांकडून दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. पण काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचे पाहण्यास मिळाले आहे.

दिल्ली पोलिसांकडून ठिकठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ट्रॅक्टर जावू नये म्हणून दिल्ली शहराच्या बसेस आडव्या लावण्यात आल्या आहेत.

नांगलोई, नजफगड, बहादुरगड येथून परत मागे जात शेतकऱ्यांची रॅली  टिकरी बार्डरवर पोहोचली. त्यावेळी  शेतकऱ्यांनी नांगलोई इथं बॅरिकेटस तोडून टाकले आहे. पोलिसांनीही शेतकऱ्यांच्या रॅलीवर अश्रू धुरांचा मारा केला आहे. त्यामुळे संतापलेल्या जमावाने पोलिसांवर चाल केली आहे. लाठ्या-काठ्या घेऊन पोलिसांच्या दिशेनं धाव घेतली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांची रॅली आता पश्चिम विहार येथून रिंग रोडकडे जात आहे.

परंतु, शेतकरी संघटनेच्या नेत्यांकडून रॅली ही शांतपणे सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जावू नये म्हणून अतिरिक्त पोलीस फौजफाटा बोलावण्यात आला आहे.

Published by: sachin Salve
First published: January 26, 2021, 1:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या