मराठी बातम्या /बातम्या /देश /

Kirit Somaiya: "कारवाई इथेच थांबणार नाही, आणखी चौघांवर लवकरच कारवाई" - किरीट सोमय्या

Kirit Somaiya: "कारवाई इथेच थांबणार नाही, आणखी चौघांवर लवकरच कारवाई" - किरीट सोमय्या

कारवाई इथेच थांबणार नाही, लवकरच आणखी चौघांवर कारवाई होणार, किरीट सोमय्यांचा इशारा

कारवाई इथेच थांबणार नाही, लवकरच आणखी चौघांवर कारवाई होणार, किरीट सोमय्यांचा इशारा

Kirit Somaiya PC: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल करताना सूचक इशाराही दिला आहे.

    नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर आयकर विभागाने धाड (Income Tax raid) टाकली आहे. मुंबई मनपात भ्रष्टाचार झाल्याचा तसेच, यशवंत जाधव यांनी शेल कंपनीत आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप केले होते. त्यानंतर आयकर विभागाकडून ही धाड टाकण्यात आली आहे. यशवंत जाधव यांच्यावरील कारवाईनंतर आणखी चौघांवर कारवाई होणार असल्याचं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी एक सूचक इशारा दिला आहे. या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत यशवंत जाधव, त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव, महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या म्हणाले, यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधवांनी आमदारकीचा फॉर्म भरताना कोट्यवधी रुपयांची माहिती लपवली ती माहिती आयकर विभागाला कळाली. काही माहिती आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी दिली. निवडणूक आयोगाचा कायदा आहे, निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर तुमच्या मालमत्तेची माहिती द्या आणि जे कोणी निवडणुकीचं फॉर्म भरतं त्यांचे फॉर्म आयकर विभागाकडे जातात. त्यानुसार, आयकर विभाग याची तपासणी करुन निवडणूक विभागाला एक अहवाल देतं आणि त्यानंतर कारवाई होते. सोमय्या पुढे म्हणाले, यामिनी जाधव, यशवंत जाधव यांच्या प्रकरणात प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड हे एक उदाहरण... यामुळे हे प्रकरण समोर आलं. कारण ही कंपनी एक शेल कंपनी आहे. ही कंपनी अधिकृतरित्या बंद म्हणून घोषित करण्यात आली. या कंपनीच्या द्वारे यशवंत जाधव यांनी 15 कोटी रुपये (जे महानगरपालिका कंत्राटदारांकडून रोकड पैसे येतात, गाड्यांमधून बॅगा भरून येतात). वाचा : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या मुंबईतल्या घरी आयकर विभागाची धाड गांधी-ठाकरे परिवारावर आरोप उदयशंकर महावार हा हवाला ऑपरेटर आहे. हा गांधी परिवाराचाही हवाला ऑपरेटर आहे. सोनिया गांधी परिवाराचे मनी लॉन्ड्रिंग करणारा हा महावार आहे. बहुतेक गांधी परिवारानेच ठाकरे परिवाराची महावार याच्यासोबत ओळख करुन दिली असेल. त्यानंतर ठाकरे साहेबांनी त्यांचा महापालिका फंड कलेक्टर यशवंत जाधवची भेट घालून दिली असेल, ते माहिती नाही. पण जाधव याचा ऑपरेटर पण उदयशंकर महावार आणि नॅशनल हेरॉल्ड ज्या वर्तमान पत्राच्या ट्रस्टी, पार्टनर सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या मनी लॉन्ड्रिंगचं काम उदयशंकर महावारने केलं आहे असंही किरीट सोमय्या म्हणाले. प्रधान डिलर्स ज्याला शेल कंपनी घोषित केलं. त्यातला यशवंत जाधव परिवारनाने 15 कोटी कॅश देऊन चेक घेतले आणि त्यावर दुसरी कंपनी केली मग तिसरी कंपनी केली. या तीन कंपन्यांद्वारे 15 कोटी आणि मालक कोण तर यशवंत जाधव. यशवंत जाधव हे मुख्य फंड कलेक्टर आहेत. 15 कोटी रुपये यशवंत जाधव कुटुंबाच्या खात्यात, त्यातील काही पैसा यूएईला पाठवण्यात आला. यासंदर्भात निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाला एक रिपोर्ट पाठवला असंही किरीट सोमय्या म्हणाले. वाचा : ठाकरे सरकारच्या 'डर्टी डझन' नेत्यांची यादी घेऊन किरीट सोमय्या दिल्लीत संजय राऊत पुन्हा आरडा-ओरड सुरू करणार किरीट सोमय्या पुढे म्हणाले, ही कारवाई इथेच थांबणार असं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असे समजत असतील... ते समजत नाहीत त्यांना सर्व कळतं... म्हणून पुन्हा आरडा-ओरड सुरू करणार संजय राऊत. परत देणार बाईट किरीट सोमय्या, निल सोमय्या, मेघा सोमय्यांना जेलमध्ये टाक. आपल्या माहितीसाठी सांगतो, मुख्यमंत्री, शरद पवार, गृहमंत्री यांच्या बैठका झाल्या. एकही कागदपत्र नाही. एक दमडीचं किरीट सोमय्या, निल सोमय्याचा भ्रष्टाचार सापडला नाही. पोलीस आयुक्त बोलले काही नाही करु शकत. त्याला म्हटले, तुला ट्रान्सफर हवीय का? नील सोमय्या विरोधात गुन्हा दाखल कर. एक महिना जामीन मिळता कामा नये. आणखी चौघांवर कारवाई उद्धव ठाकरेजी तुमच्या अशा धमक्यांना घाबरणार नाही. आम्हाला तिघांना जेलमध्ये जावं लागलं तरी तुमच्या डर्टी डझनभर घोटाळे लॉजिकल शेवटपर्यंत घेऊन जाणार. हे तर यशवंत जाधव आहेत. अजून इतर चौघांची अशाच प्रकारे कागदपत्रांसह... त्याचा पाठपुरावा विविध एजन्सीने सुरू केला आहे असंही किरीट सोमय्या म्हणाले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Kirit Somaiya, Shiv sena

    पुढील बातम्या