'बॉसला सांगा, तो सुट्टी देईल... ' केंद्रीय मंत्र्यांची चिमुरडी बाबाकडे लाडिक हट्ट करते तेव्हा...
मुलीचा लाडिक हट्ट बापाला मोडवत नाही, मग वडील केंद्रीय मंत्री का असेना. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी आपल्या मुलीचा एक व्हिडिओ शेअर केलाय. तो पाहिलात तर तुम्हालाही हे पटेल. वडिलांना लडिवाळ हट्ट करणाऱ्या या गोड चिमुरडीचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.
नवी दिल्ली, १ ऑक्टोबर : केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी सोशल मीडियावर टाकलेला आपल्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. माझ्या शाळेत तुम्ही कधीच आला नाहीत. आता ग्रँडपेरेंट्स डेला आजी-आजोबा इथे नाहीत, तर तुम्ही तरी या असा लाडिक हट्ट ती बाबांजवळ करत असतानाचा हा व्हिडिओ आहे.
शाळेत यायला वेळ होत नाही, कारण ऑफिसमध्ये खूप काम असतं, असं बाबा अर्थात किरण रिजिजू तिला सांगतात तेव्हा ही चिमुरडी निखळपणे सांगते की, तुमच्या बॉसला सांगा मुलीच्या शाळेत जायलाच हवंय, बॉस तुम्हाला सुट्टी देईल, असंही ती सांगतानाचा हा व्हिडिओ आहे.
This is how my little daughter convinced me to attend her school's "Grandparents Day" for the first time. pic.twitter.com/ZaIt3y658D
अखेर आपण मुलीच्या शाळेत गेलो, असंही किरण रिजिजू यांनी ट्वीट केलंय. शाळेत मुलीबरोबरचा एक फोटोही त्यांनी शेअर केलाय. २१ हजार लोकांनी तो लाईक केलाय आणि ही बातमी लिहिपर्यंत अडीच हजार लोकांनी हा व्हिडिओ शेअरही केला होता.