पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी वादाच्या भोवऱ्यात

पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी वादाच्या भोवऱ्यात

भर कार्यक्रमात आमदाराचा माईक बंद करण्याची सूचना

  • Share this:

पुद्दुचेरी ०३ ऑक्टोबर २०१८- माजी आयपीएस अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी पुन्हा वादात सापडल्या आहेत. गांधी जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात बेदी आणि अण्णा द्रमुकचे आमदार अनबाळगन यांच्यात वाद झाला. अनबाळगन हे नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ बोलत होते हे आयोजकांनी निदर्शनास आणून दिले. पण तरीही आमदार अनबाळगन कोणाचंही ऐकत नव्हते.मग मंचावर असलेल्या बेंदींनी आमदारांचा माईक बंद करा, अशी सरळ सूचनाच दिली. आमदार अनबाळगन यांना हा त्यांचा अपमान वाटला आणि सर्वांसमोरच त्यांच्यात आणि बेदींमध्ये वादावादी सुरू झाली. शेवटी इतर आमदारांनी मध्यस्थी केल्यावर अनबाळगन कार्यक्रम सोडून निघून गेले.

विशेष म्हणजे त्या कार्यक्रमात आमदार अनबाळगन यांना स्टेजवर बोलवण्यात आलं नव्हतं शिवाय भाषण देणाऱ्यांच्या यादीत त्यांचे नावही नव्हते. तरीही राज्यपालांनी त्यांना कार्यक्रमात थोडक्यात भाषण करण्यास सांगितले. शेवटी बेदी यांनी माईक बंद करण्यास सांगितले. आमदार ए. अनबाळगन यांनी आपली बाजू मांडताना म्हटले की, ‘बेदी या पुद्दूचेरीच्या विकासाच्या आड येत आहेत. त्या आमदारांना मान देत नसून त्यांनी स्वतःचा स्वभाव बदलला पाहिजे.’

First published: October 3, 2018, 3:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading