संघाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय फोडलं ?

संघाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय फोडलं ?

इंदौरमध्ये जमावानं एका रुग्णालयाची जमावाने तोडफोड केली. तोडफोड करणारे संघाचे कार्यकर्ते होते

  • Share this:

01 एप्रिल : डाॅक्टराच्या मारहाणीच्या निषेधार्थ डाॅक्टरांचा संप नुकताच संपलाय. मात्र रुग्णालयाच्या तोडफोडीचे प्रकार सुरूच आहे. इंदौरमध्ये जमावानं एका रुग्णालयाची जमावाने तोडफोड केली. तोडफोड करणारे संघाचे कार्यकर्ते होते असं बोललं जातंय पण त्याबबात पोलिसांनी पुष्टी केलेली नाही.

मध्यप्रदेशमधील इंदौरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  संघाचे नेते हिम्मत राठोड यांच्यावर गोकुळदार रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी कळताच रुग्णालयात या जमावानं तोडफोड सुरू केली. पोलीस आल्यावर त्यांनी या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत मोठं नुकसान झालं होतं. काचा, खुर्च्या, स्ट्रेचरचं खूप नुकसान झालंय. या प्रकरणी अजून कुणाला अटक झाल्याचं वृत्त नाहीय.

दरम्यान, पोलीस घटनेची आणि राठोड यांच्यावरच्या उपचारात हलगर्जीपणा झाला का, याचीही चौकशी करत आहेत.  हलगर्जीपणा झाला असो वा नसो, पण त्यासाठी इतर रुग्णांचं नुकसान कशासाठी, हा मोठा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2017 04:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading