मराठी बातम्या /बातम्या /देश /

चोरी केली म्हणून बेदम मारलं; त्यानंतर गुप्तांगात दिला करंट, तरुणाची प्रकृती गंभीर

चोरी केली म्हणून बेदम मारलं; त्यानंतर गुप्तांगात दिला करंट, तरुणाची प्रकृती गंभीर

चोरी केली म्हणून पोलिसांनी आरोपींविरोधात थर्ड डिग्रीचा वापर केला. त्यानंतर गावकऱ्यांनी रस्ता रोको केला.

चोरी केली म्हणून पोलिसांनी आरोपींविरोधात थर्ड डिग्रीचा वापर केला. त्यानंतर गावकऱ्यांनी रस्ता रोको केला.

चोरी केली म्हणून पोलिसांनी आरोपींविरोधात थर्ड डिग्रीचा वापर केला. त्यानंतर गावकऱ्यांनी रस्ता रोको केला.

  • Published by:  Meenal Gangurde

पलामू, 11 ऑक्टोबर : झारखंडमधील पलामू भागात पोलिसांचा (Police) अत्यंत क्रुर चेहरा समोर आला आहे. पोलिसांनी चोरी केलेल्या दोन आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून बेदम मारहाण केली. ते इतक्यावरच थांबले नाही तर आरोपींविरोधात थर्ड डिग्रीचा वापर करण्यात आला. पोलिसांनी आरोपींच्या गुप्तांगात करंट दिला. यानंतर दोघांची प्रकृती खालावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बेडमा भभंडी गावातील निवासी रजनीकांत दुबे आणि विकास पासवान यांना दोन दिवसांपूर्वी चोरीच्या आरोपीखाली पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. आरोपी पोहोचताच ठाणा प्रभारी सुनील कुमार आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अत्यंत क्रुरपणे मारलं. पीडित रजनीकांत दुबे याने सांगितले की मारहाण केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या गुप्तांगात करंट दिला. आणि अश्लिल शिव्यांचा वापर केला.

हे ही वाचा-'बाबा का ढाबा'नंतर केरळमधील पार्वती अम्माचा VIDEO VIRAL; मदतीसाठी नेटकरी सरसावले

पोलिसांविरोधात रस्त्यावर उतरले गावकरी

रजनीकांत दुबे याची प्रकृती नाजूक असून त्याला त्याच अवस्थेत खाटेवर झोपवून गावकऱ्यांनी रस्ता अडवला आणि दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. गावकऱ्यांनी आरोप केला आहे की, चैनपूर ठाण्यातील पोलिसांनी दबंगगीरी दाखवीत आधी दोघांना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर गुप्तांगात करंट दिला. यामध्ये एका व्यक्तीची प्रकृती नाजूक आहे. आंदोलनस्थळी पोहोचत डीएसपी संदीप गुप्ता यांनी गावकऱ्यांची समजूत घातली व रस्ता रोको मागे घेण्यास सांगितले. डीसीपी या प्रकरणाचा तपास करीत आहे. तर नातेवाईकांचं म्हणणं आहे की, जर चोरीचा आरोप होता मग पोलिसांना तुरुंगात पाठवायला हवं होतं. माग चौकशी करण्याच्या नावाखाली पोलिसांनी आरोपींनी करंट दिला व टॉर्चर केलं. दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आरोपीच्या कुटुंबीयांनी केली आहे.

First published: