Home /News /national /

प्रवक्तेपदावरुन हटवल्यानंतर खुशबू सुंदर यांचा काँग्रेसला रामराम; भाजपमध्ये केला प्रवेश

प्रवक्तेपदावरुन हटवल्यानंतर खुशबू सुंदर यांचा काँग्रेसला रामराम; भाजपमध्ये केला प्रवेश

आठ महिन्यांवर तामिळनाडूमध्ये निवडणुका होणार आहे, त्यामुळे भाजपला याचा मोठा फायदा होऊ शकतो.

    चेन्नई, 12 ऑक्टोबर : 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे व त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रसने खुशबू यांना पक्ष प्रवक्ता पदावरुन हटवले होते. त्यानंतर पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून खुशबू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली. आपण पक्षात पैसा, नाव किंवा प्रसिद्धी मिळविण्यासाठी आलो नव्हते, पक्षात वरिष्ठ पदावर बसलेले काही जण आणि ज्यांना जनतेशी काहीही संबंध नाही, असे नेते हुकुमशाही करू पाहत आहेत. मात्र पक्षावर निष्ठा असलेल्या  माझ्यासारख्या लोकांना बाजूला केले जात आहे, असे खुशबू यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या खुशबू यांनी यापूर्वी अनेक पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. 2010 मध्ये त्या डीएमकेमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी डीएमके सत्तेत होत्या. मला वाटतं की मी योग्य निर्णय घेतला आहे. मला लोकांची सेवा करायला आवडते. मला महिलांच्या सबलीकरणाठी काम करायचे आहे, असे खुशबू म्हणाल्या होत्या. हे ही वाचा-दसरा दिवाळीआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट! सरकार विनाव्याज देणार 10000 भाजपमध्ये केला प्रवेश खुशबू सुंदर या राज्यात अतिशय लोकप्रिय आहेत. आठ महिन्यानंतर तामिळनाडूमध्ये निवडणुका होणार आहेत. राज्यात भारतीय जनता पक्षाचा प्रभावदेखील मर्यादित स्वरुपाचा आहे. यामुळे खुशबू यांची स्टार पॉवर आपल्याकडे घेण्यास भाजप उत्सुक असणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. भाजपमध्ये सध्या राज्यात वजन  असलेला कोणताही नेता नाही, त्यामुळे खुशबू यांच्या भाजप प्रवेशामुळे येत्या निवडणुकीत पक्षाला करिश्मा दाखवता येईल अशी चर्चा सुरू आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Congress

    पुढील बातम्या