Elec-widget

मेट्रोचं रक्षण करण्यासाठी आणला आहे हा सगळ्यात महागडा श्वान!

मेट्रोचं रक्षण करण्यासाठी आणला आहे हा सगळ्यात महागडा श्वान!

सुरक्षा यंत्रणांच्या ताफ्यातल्या प्रशिक्षित कुत्र्यांबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. याच श्वानपथकामध्ये आता एक व्हीआयपी श्वान आला आहे. त्याचं नाव आहे खोज. खोज अशा मानांकित प्रजातीतला आहे की ज्या प्रजातीतल्या कुत्र्यांनी ओसामा बिन लादेनला ठार करणाऱ्या यूएस नेव्ही सीलच्या पथकाला मदत केली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जुलै : सुरक्षा यंत्रणांच्या ताफ्यातल्या प्रशिक्षित कुत्र्यांबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. याच श्वानपथकामध्ये आता एक व्हीआयपी श्वान आला आहे. त्याचं नाव आहे खोज.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा पथकाने 'खोज' वर एक लाख रुपयांपेक्षाही जास्त पैसे खर्च केले आहेत. या बेल्जियन प्रजातीच्या श्वानाला मेट्रोच्या संरक्षण पथकात तैनात केलं जाणार आहे.

खोज अशा मानांकित प्रजातीतला आहे की ज्या प्रजातीतल्या कुत्र्यांनी ओसामा बिन लादेनला ठार करणाऱ्या यूएस नेव्ही सीलच्या पथकाला मदत केली होती.

आता 'खोज' चं बंगळुरूमधल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेंनिंग होणार आहे. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने या श्वानाला भारतात आणण्यासाठी आणि त्याच्या ट्रेनिंगसाठीचा खर्च उचलला आहे.

आत्ता खोज तीन महिन्यांचा आहे आणि त्याचं हे वय प्रशिक्षणासाठी योग्य आहे. आता सुमारे 10 महिने त्याला प्रशिक्षण दिलं जाईल. यामध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये न डगमगता स्फोटकांचा छडा लावण्यासारखं प्रशिक्षण असेल.

Loading...

'ओसामा'च्या मागावर

हा श्वान स्फोटकं घेऊन येणाऱ्या आत्मघातकी पथकांचा छडा लावू शकतो. त्यामुळेच ओसामा बिन लादेनच्या मागावर असलेल्या यूएस नेव्ही सीलच्या पथकांनी 'खोज' सारख्या श्वानांना मदतीला घेतलं होतं.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जेव्हा भारत दौऱ्यात दिल्लीला आले होते तेव्हा त्यांच्या येण्याआधीची सुरक्षा चाचपणी याच बेल्जियन मॅलिनॉइस प्रजातीच्या श्वानांनी केली होती.

या श्वानांचा समावेश माओवादग्रस्त भागांत राष्ट्रीय सुरक्षा दल आणि सीआरपीएफ या पथकांमध्येही करण्यात आला होता. याशिवाय काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये 2011 मध्ये शिकाऱ्यांचा छडा लावण्यासाठीही याच श्वानांचा उपयोग करण्यात आला होता.

खोज हा श्वान सलग 25 ते 30 किलोमीटर चालू शकतो. तसंच तो अनेक कामं एका वेळी करू शकतो. आतापर्यंत या श्वानांनी 250 वेळा स्फोटकं किंवा घातपाताचा छडा लावला आहे, असं बंगळुरूच्या ट्रेनिंग सेंटरचे वरिष्ठ अधिकारी मोझेस दिनकरन यांनी सांगितलं.

================================================================================================

आदित्य ठाकरेंचा धुळ्यात तरुणांशी संवाद, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 07:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...