01 नोव्हेंबर : मुगाची खिचडी आता राष्ट्रीय खाद्य म्हणून जाहीर होणार आहे. 4 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय खाद्य दिवशी याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.
केंद्र सरकारच्या केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं दिलेल्या प्रस्तावानंतर मुगाच्या खिचडीला राष्ट्रीय खाद्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. येत्या 4 नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या खाद्य दिनी दिल्लीत औपचारिकपणे मुगाच्या खिचडीला हा दर्जा दिला जाणार आहे.
खिचडीकडे पूर्णान्न म्हणून पाहीलं जातं. श्रीमंत असो वा गरीब, मुगाची खिचडी सर्वांनाच आवडते. डाळ, तांदूळ आणि कमीत कमी मसाल्यांमध्ये खिचडी तयार होते. मुगाची खिचडी ही पौष्टिक तर आहेच शिवाय चविष्ट, कमी वेळात आणि खर्चात तयार होत असल्यानं तिला हा दर्जा मिळत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा