खिचडीची बनली अफवा, राष्ट्रीय खाद्य पदार्थ नाही,फक्त ब्रँड

खिचडीची बनली अफवा, राष्ट्रीय खाद्य पदार्थ नाही,फक्त ब्रँड

3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या इव्हेंटमध्ये भारताचा ब्रँड म्हणून खिचडीला मान दिला गेला आहे. पण मग मंडळी, त्याचा अर्थ असा नाही की खिचडीची राष्ट्रीय खाद्य पदार्थ म्हणून निवड झाली.

  • Share this:

02 नोव्हेंबर: अहो नाही, खिचडीची राष्ट्रीय खाद्य पदार्थ म्हणून निवड नाही करण्यात आलीय. कालपासून वाऱ्यासारखी ही बातमी सगळ्यांकडे पोहचली की खिचडी आता राष्ट्रीय खाद्य होणार आहे.पण ही अफवा आहे, असं अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी हे स्पष्ट केलं आहे.

ते झालं असं की, अन्न प्रक्रिया मंत्रालयाने 'वर्ल्ड फूड इंडिया इव्हेंट'ची घोषणा केली . 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान हा  कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

या इव्हेंटमध्ये भारताचा ब्रँड म्हणून खिचडीला मान दिला गेला आहे. पण मग मंडळी, त्याचा अर्थ असा नाही की खिचडीची राष्ट्रीय खाद्य पदार्थ म्हणून निवड झाली.

अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी यावर ट्विट केलं, 'खिचडी राष्ट्रीय खाद्य पदार्थ असल्याच्या अफवेची सगळीकडे खिचडी करण्यात आली. पण खिचडीला या इव्हेंटमध्ये फक्त भारताचा ब्रँड म्हणून पेश करण्यात येणार आहे.'

आता भले खिचडी राष्ट्रीय खाद्य पदार्थ नाही, पण तरी या कार्यक्रमानिमित्त आपली डाळ, तांदूळ आणि कमीत कमी मसाल्यांमध्ये बनणारी खिचडी सगळ्यांना चाखायला मिळणार हे नक्की. देशाचे अव्वल खवय्ये संजीव कपूर खिचडीला बनवणार आहे. ते ग्रेट इंडिया फूड स्ट्रीटचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. यावेळी 800 किलो खिचडी बनवून जागतिक विक्रम करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. 1000 लीटरच्या कढईमध्ये ते खिचडी बनवणार आहेत. दिल्लीच्या इंडिया गेटसमोर हा कार्यक्रम पार पडणार आहे.

अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्यामुळे भारतातील विविध राज्यांमध्ये पसरलेल्या अन्न संस्कृतीला जगासमोर आणण्यात येईल. या कार्यक्रमाद्वारे मंत्रालय भारतातील अन्नप्रक्रिया उद्योगात गुंतवणूक वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांनाही आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहे.

भारतातून सहा हजाराच्या वर अन्नपदार्थ तज्ज्ञ यात भाग घेतील.  9 सेमिनार्स होतील, 400हून जास्त प्रदर्शनं होतील. 20हून अधिक देश यात भाग घेतील.

First published: November 2, 2017, 2:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading