दोन सज्ञानांच्या लग्नात इतर कुणीही लुडबुड करू नये-सुप्रीम कोर्ट

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचं खंडपीठ यावर सुनावणी करत आहेत. खाप पंचायतीकडून प्रेमी युगुलांवर होणाऱ्या हल्ल्यांवर सुप्रीम कोर्ट टीका करतं आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Feb 5, 2018 04:39 PM IST

दोन सज्ञानांच्या लग्नात  इतर कुणीही लुडबुड करू नये-सुप्रीम कोर्ट

05 फेब्रुवारी :   दोन सज्ञांच्या लग्नात कोणी तिसऱ्याने लुडबुड करू नये अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने खाप पंचायतींना फटकारलं आहे.  खाप पंचायतींच्या लग्नविषयक धोरणाविरूद्ध याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यत आली आहे. या  याचिकेवर अंतिम निर्णय 16 फेब्रुवारीला देण्यात येणार आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचं खंडपीठ यावर सुनावणी करत आहेत. खाप पंचायतीकडून प्रेमी युगुलांवर होणाऱ्या हल्ल्यांवर सुप्रीम कोर्ट टीका करतं आहे.   काही दिवसांपूर्वी जातीबाहेर लग्न करणाऱ्यांवर हल्ला करणं अयोग्य असल्याचं म्हणत कोर्टाने खाप पंचायतींना खडसावलं होतं. आजचा निर्णय देताना प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी सर्वस्वी पोलिसांची आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. तसंच  लग्न कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हे ठरवण्याचा हक्क सर्वस्वी कोर्टाचा आहे खाप पंचायतीचा नाही हेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय. यापुढे जाऊन या अन्याय्य खाप पंचायतींवर बंदी आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे असा  सल्लाही सुप्रीम कोर्टाने   सरकारला दिला आहे.

आता यापुढे सरकार खाप पंचायतींविरूद्ध सरकार पाऊलं उचलतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 5, 2018 04:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...