लखनऊ, 2 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशात 2014 साली मुझफ्फरनगर जिल्ह्यातील खाप पंचायतीने मुलींनी मोबाईल फोन वापरण्यास व जीन्स घालण्यास बंदी घातली होती. आता या पंचायतीने आणखीन एक नियम आणला आहे. या वेळी हा नियम पुरुषांसाठी लागू करण्यात आला आहे. खाप पंचायतीच्या नव्या नियमानुसार गावात पुरुषांना शॉर्ट्स घालण्यास बंदी घालण्यात आली आहे.
ANI शी बोलताना बलयन खाप पंचायत नेते नरेश टिकैत यांनी सांगितले की दर वेळी फक्त महिलांवर निर्बंध घालणं योग्य नाही म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे." पुरुषांनी बाजारपेठेत किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी हाफ पॅन्टमध्ये जाणं योग्य नाही म्हणूनच हा निर्णय घेतला गेला आहे. आपण त्याला आदेश म्हणू शकत नाही हा आमच्या तर्फे दिला गेलेला एक चांगला सल्ला आहे. निर्बंध हे फक्त मुलींवर लादणं योग्य नाही," असं टिकैत यांचं म्हणणं आहे.
पंचायतीने घातलेल्या निर्बंधांवर ट्विटरवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मागील वेळेप्रमाणे अनेक लोकांनी यावर टीका सुद्धा केली आहे. आणि म्हटले आहे की एकविसाव्या शतकात हे असं निर्बंध लादणं योग्य नाही.
हे ही वाचा-नोव्हेंबरच्या या तारखा लक्षात ठेवा; आकाशात दिसणार 10 अद्भुत गोष्टी
2014 मध्ये महिलांना जीन्स आणि मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालताना खाप पंचायतीच्या नेत्यांनी जीन्स परिधान केलेल्या मुलींनी समाज बिघडवल्याचं सांगितलं होतं. टिकैत यांनी सांगितले की महिलांनी जीन्स घालण्यावरील बंदी यशस्वी झाली असून आता मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. गावातल्या अनेक महिलांनी शॉर्ट्स घातलेल्या पुरुषांविरोधात तक्रार केल्यावर आम्ही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असं टिकैत यांनी सांगितले. ते म्हणाले, की जर कोणता पुरुष गावात शॉर्टवर आढळला तर त्याचं नाव व पत्ता नोंदवला जाईल आणि पंचायत त्याच्या विरोधात कठोर कारवाई करेल.
2014 मध्ये टिकैत यांनी सर्वोच्च न्यायालयात टीका केली होती आणि असं म्हटलं होतं की मुलांची लग्ना आहे मुलांच्या आईवडिलांचा खासगी प्रश्न आहे न्यायालयाने आमच्या रुढी परंपरांमध्ये हस्तक्षेप करू नये. आमच्या मुलांचं लग्न करणं हा आमचा प्रश्न आहे. त्यांच्या शिक्षणावर आणि पालन पोषणावर आम्ही 30 ते 40 लाख रुपयांहून अधिक पैसे गुंतवतो. पण जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा ते पळून जातात आणि आमच्याच गोत्रातील मुलीसोबत पोलिसांच्या संरक्षणाखाली राहतात असं टिकैत यांचं म्हणणं होतं. बहुतांश भारतात सगोत्र विवाह करू नयेत अशी प्रथा पाळली जाते.
|
||||