लखनऊ, 29 सप्टेंबर: एका प्रेमीयुगुलाला खाप पंचायतीने अमानुष शिक्षा (Inhuman punishment) दिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. संबंधित प्रेमीयुगुलाला खाप पंचायतीपुढे उभं केल्यानंतर, पंचायतीने ते तालिबानी फर्मान (khap panchayat give talibani punishment to minor love couple) सुनावलं आहे. त्यानंतर गावातील काही तरुणांनी प्रेमीयुगुलाच्या तोंडाला काळं फासून त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर आरोपींनी प्रेमीयुगुलाची गावभर धिंड काढत आसुरी आनंद लुटला आहे.
या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच संबंधित आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. संबंधित संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील गौर पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या एका गावातील आहे. गावातील एक दलित अल्पवयीन युवक आणि युवती गावकऱ्यांना आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले होते. त्यानंतर गावकऱ्यांनी संबंधित प्रेमीयुगुलाला खाप पंचायतीसमोर उभं केलं होतं.
उत्तरप्रदेश के बस्ती में दलित नाबालिग प्रेमी युगल को भरी पंचायत में तालीबानी फरमान सुनाया गया। जिसमें प्रथम उनके चेहरे पर कालिख पोता गया। गले में चप्पलों की माला पहनाई गई। बाद में पूरे गांव में जुलुस निकाला गया। मैं उम्मीद करूंगा इस घटना पर सीएम @myogiadityanath दो शब्द बोलेंगे। pic.twitter.com/dYf6aDi7Q4
— Hansraj Meena (@HansrajMeena) September 29, 2021
त्यानंतर खाप पंचायतीने सुनावलेल्या निर्णयानुसार, आरोपींनी पीडित तरुण-तरुणीच्या तोंडाला काळं फासून गळ्यात चपलांचा हार घातला आहे. एवढंच नव्हे तर, आरोपींनी पीडित प्रेमीयुगुलाला अमानुष वागणूक देत गावभर फिरवलं आहे. ह्या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून 5 जणांना अटक केली आहे.
हेही वाचा-विवाहित महिला-पुरुषाचं एकमेकांवर जडलं प्रेम;लॉजमध्येच झाला लव्ह स्टोरीचा The End
खाप पंचायतीने दिलेल्या तालिबानी शिक्षेमुळे उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशात घटनेचा कायदा असूनही खाप पंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या अमानुष शिक्षेमुळे सोशल मीडियातही संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेची तीव्र निषेध व्यक्त करत संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Uttar pradesh