गो तस्करीचा संशय, पाहा काय केलं गो रक्षकांनी

गो तस्करीचा संशय, पाहा काय केलं गो रक्षकांनी

मध्य प्रदेशातील खंडवामध्ये गो तस्करीच्या संशयावरून 25 जणांना बांधून ठेवून त्यांना पोलिसांच्या हवाली करण्यात आलं.

  • Share this:

भोपाळ, 08 जुलै : देशात गो तस्करीच्या संशयावरून मारहाण केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मध्य प्रदेशातील खंडवामध्ये देखील अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये 100 गो रक्षकांनी 25 जणांना गो तस्करीच्या संशयावरून बांधून ठेवलं त्यानंतर त्यांना गो माता की जय अशा घोषणा देण्यास देखील भाग पाडलं. रविवारी ही घटना मध्य प्रदेशातील खंडवा येथे घडली आहे. त्यानंतर या 25 जणांना पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. खंडवा जिल्ह्या मुख्यालयापासून 60 किमी अंतरावर असलेली सांवलीखेडा या गावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी गो तस्करांविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे.

गो तस्करीच्या घटना

यापूर्वी देखील राजस्थान झारखंडमध्ये गो तस्करीच्या संशयावरून काही लोकांची जमावानं ठेचून हत्या केली आहे. 2017मध्ये देखील राजस्थानच्या अलवरमध्ये असा प्रकार समोर आला होता. शिवाय, आठवड्याभरापूर्वी देखील झारखंडमध्ये 24 वर्षाच्या तरूणाला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली होती. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. या मारहाणीत तरूणाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, देशात गो तस्करी आणि त्यावरून होणारी मारहाण यावरून आता विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. अलवरमध्ये लावण्यात आलेल्या कलमावरून देखील राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर टीका करण्यात आली होती. संसदेत देखील गो रक्षकांच्या मुद्यावर प्रश्न विचारले जात आहेत.

VIDEO : 'माझ्या मुलाला वाचवा', नारायण राणेंनी माझ्याकडे विनंती केली; पण...

First published: July 8, 2019, 11:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading