मराठी बातम्या /बातम्या /देश /

काश्मीरमध्ये 5 जवानांना वीरमरण, चकमकीत 5 दहशतवाद्यांचा केला खात्मा

काश्मीरमध्ये 5 जवानांना वीरमरण, चकमकीत 5 दहशतवाद्यांचा केला खात्मा

केरन सेक्टरमध्ये दहशतवादी घुसखोरी करत असल्याचं समजल्यानंतर लष्कराने शोध मोहिम सुरु केली होती.

केरन सेक्टरमध्ये दहशतवादी घुसखोरी करत असल्याचं समजल्यानंतर लष्कराने शोध मोहिम सुरु केली होती.

केरन सेक्टरमध्ये दहशतवादी घुसखोरी करत असल्याचं समजल्यानंतर लष्कराने शोध मोहिम सुरु केली होती.

    श्रीनगर, 05 एप्रिल : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यदलाने गेल्या 24 तासात सीमारेषेवर 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. दरम्यान, पुन्हा एकदा सीमेवर चकमक झाली. त्यामध्ये 5 घुसखोर ठार तर 5 जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे, केरन सेक्टरमध्ये दहशतवादी घुसखोरी करत असल्याचं समजल्यानंतर लष्कराने शोध मोहिम सुरु केली होती. त्यावेळी घुसखोर आणि जवानांमध्ये चकमक झाली. लष्कराकडून या केरन सेक्टरमध्ये शोधमोहिम सुरू आहे. रविवारी सकाळी झालेल्या चकमकीमध्ये भारतीय लष्कराने 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या मोहिमेत 4 पॅरा स्पेशल फोर्स, 41 आरआर, 57 आरआर, 8 जाट आणि एसओजी कुपवाडा यांनी सहभाग घेतला होता. सकाळी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला होता. याशिवाय इतर दोन जवान जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे वाचा : भारतीय सैन्याची मोठी कारवाई, 9 दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद याआधी शुक्रवारी रात्री दहशतवादी सीमेपलिकडून घुसखोरी करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी सुरक्षा दलांनी कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा सज्ज करत चार दहशतवाद्यांना घेरलं. दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त कऱण्यात आला.  ते सर्व दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचे असल्याचं म्हटलं जात आहे. हे वाचा : सलाम कर्तव्याला! लग्नासाठी घेतलेली सुट्टी रद्द करून ड्युटीवर हजर झाली शाहिदा
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या