अनुराधा पौडवाल माझी आई, केरळच्या महिलेचा दावा; कोर्टात दाखल केला 50 कोटींचा दावा
अनुराधा पौडवाल माझी आई, केरळच्या महिलेचा दावा; कोर्टात दाखल केला 50 कोटींचा दावा
करमाला यांचे वडील पोंनाचन हे लष्करात होते. त्यांचं पोष्टींग महाराष्ट्रात होतं. त्या काळात त्यांची आणि अनुराधा पौडवाल यांची ओळख होती अशी माहितीही त्यांनी दिली.
तिरूअनंतरपुरम 02 जानेवारी : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल या आपल्या आई असल्याचा दावा केरळमधल्या एका महिलेनं केलाय. करमाला मोडेक्स असं त्यांचं नाव असून त्या 45 वर्षांच्या आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. करलमाला यांनी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला असून अनुराधा पौडवाल यांच्याकडे त्यांनी 50 कोटींची नुकसानभरपाई मागतलीय. तिरूअनंतरपुरम कोर्टाने पौडवाल यांना नोटीस बजावली असून 27 जानेवारीला कोर्टात हजर राहायला सांगितलंय. करमाला यांनी आपल्या वकिलासोबत एक पत्रकार परिषद घेऊन हा मोठा दावा केलाय. करमाला यांनी सांगितलं की, त्या फक्त चार वर्षांच्या होत्या तेव्हा अनुराधा पौडवाल यांनी त्यांना केरळच्या त्यांच्या मित्राच्या हवाली केलं होतं. पोंनाचन आणि अगनेस असं त्यांच्या केरळच्या पालकांचं नाव आहे.
40 वर्षांपूर्वी पौंडवाल दाम्पत्यांनी त्यांना केरळला ठेवलं होतं. त्यांचे वडिल पोंनाचन यांचं 5 वर्षांपूर्वी निधन झालंय. त्या आधी त्यांनी करमाला यांना खरी परिस्थिती सांगितली होती. अनुराधा पौडवाल या त्या काळात गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये अतिशय व्यस्त होत्या. त्यामुळे त्यांनी असं केलं असावं असंही त्यांनी सांगितलं. इंडियन एक्सप्रेसनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
करमाला यांचे वकील अनिल प्रसाद यांनी सांगितलं की, करमाला यांची लहानपणापासून आईचं प्रेम मिळालं नाही. त्यांना दु:ख सोसावं लागलं. त्याची भरपाई म्हणून अनुराधा पौडवाल यांनी त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. अनुराधा पौडवाल यांनी करमाला यांचा मुलगी म्हणून स्वीकार करावा. त्यांनी तसं केलं नाही तर आम्ही DNA चाचणीची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
करमाला यांचे वडील पोंनाचन हे लष्करात होते. त्यांचं पोष्टींग महाराष्ट्रात होतं. त्या काळात त्यांची आणि अनुराधा पौडवाल यांची ओळख होती अशी माहितीही त्यांनी दिली. जेव्हा ही गोष्ट आपल्याला कळाली त्यानंतर आपण अनुराधा पौडवाल यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी बोलल्याचं टाळलं आणि आपला नंबरही ब्लॉक केला असंही त्या म्हणाल्या.
('न्यूज18 लोकमत' या बातमीची खातरजमा करू शकलेलं नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.