मराठी बातम्या /बातम्या /देश /

केरळात 12 तासांत दोन नेत्यांच्या हत्येने खळबळ, जमावबंदीचे आदेश लागू

केरळात 12 तासांत दोन नेत्यांच्या हत्येने खळबळ, जमावबंदीचे आदेश लागू

12 तासात 12 किलोमीटरच्या हद्दीत दोन नेत्यांच्या हत्या, धारदार शस्त्राने केले वार

12 तासात 12 किलोमीटरच्या हद्दीत दोन नेत्यांच्या हत्या, धारदार शस्त्राने केले वार

Two politicians killed: 12 तासांत दोन नेत्यांच्या हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

  • Published by:  Sunil Desale

तिरुवनंतपुरम, 19 डिसेंबर : केरळात (Kerala) राजकीय नेत्यांच्या हत्येचं सत्र सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. शनिवारी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया Social Democratic Party of India (SDPI) आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्षांच्या दोन नेत्यांची कथितपणे हत्या करण्यात आली आहे. ही घटना अलाप्पुझा परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. यापैकी काही जणांचा या हत्येत थेट संबंध असल्याचं बोललं जात आहे. दोन्ही राजकीय नेत्यांच्या हत्या या 12 तासांत करण्यात आल्या असून 12 किलोमीटरच्या परिसरात घडल्या आहेत. (Murders of two young political leaders in gap of less than 12 hours)

एका मागे एक राजकीय नेत्यांच्या हत्येमुळे जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या तणावपूर्ण स्थितीत कुठलंही गैरकृत्य होऊ नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हय्यात तळ ठोकून बसले आहेत. 12 तासांत दोन तरुण राजकीय नेत्यांच्या हत्येने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवस जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

वाचा : देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करत पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना दिला 'हा' सल्ला

मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले असता हल्ला

एसडीपीआयचे राज्य सचिव 38 वर्षीय शान के एस हयांची शनिवारी रात्री अज्ञात टोळक्याने हत्या केली. धारदार शस्त्राने हल्ला करुन त्यांची हत्या करणअयात आली. त्यानंतर 12 तासांतच भाजप ओबीसी मोर्चाचे नेते रणजीत श्रीनिवास (BJP OBC Morcha Ranjith Srinivasan) यांची राहत्या घराबाहेर हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, भाजप नेते मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले असता आठ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. चाकू हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असता त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वाचा : 'राम तेरी गंगा मैली हो गयी' गुलाबराव पाटलांनी साधला खडसेंवर निशाणा

स्कूटरवरुन घरी परतत असताना चाकू हल्ला

एसडीपीआयचे नेते शान के एस ही आपल्या स्कूटरवरुन मन्नाचेरी येथील घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोर हे दुचाकीवरुन आले होते. हल्लेखोरांनी धारदार चाकूने शान कए एस यांच्यावर हल्ला केला. जखमी झालेल्या शान यांना उपचारासाठी एर्नाकुलम येतील जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारा दरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

केरळचे मुख्यमंत्री पनाराई विजयन यांनी अलाप्पुझा येथे दोन राजकीय नेत्यांच्या हत्येप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. सरकार कुणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करम्यात येईल असंही ते म्हणाले आहेत.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)ने एसडीपीआयच्या नेत्याच्या हत्येप्रकरणी आरएसएसवर गंभीर आरोप केला आहे. या हत्या प्रकरणात आरएसएसचा सहभाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर आरएसएसने हा आरोप फाठालून लावला आहे.

First published:

Tags: Crime, Kerala, Murder, Politics